robbery esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शिरसोली रस्त्यावर दोन मित्रांना लुटले; पोलिसांकडून तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव-शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉनजवळ दुचाकीस्वारांचा रस्ता आडवून तीन भामट्यांनी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन, असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी तीन भामट्यांना अटक केली आहे. (Two friends were robbed on Shirsoli road jalgaon crime news)

अभिषेक जगन्नाथ निंभोरे (वय २४, रा. किसनरावनगर जळगाव) मित्रासमवेत मंगळवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास दुचाकीने रायसोनी महाविद्यालयातून जळगावात येत असताना, कृष्णा लॉन्सजवळ अनोळखी दोन भामट्यांनी दोघांची दुचाकी आडविले.

अभिषेक निंभोरे आणि त्याच्या मित्राला दमदाटी करून १५ हजार रुपयांचा मोबाईल आणि दोन हजार रुपयांची चांदीची चैन, असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याबाबत अभिषेक निंभोरे याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीस पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इम्रान सय्यद, छगन तायडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी साहिल विजय कासार यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

साथीदार भोला अजय सरपटे (वय २२, रा. नवल कॉलनी), आतिष नरेश भाट (वय २३, रा. कंजरवाडा) यांची नावे सांगितले. त्या दोघांनाही एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT