Water Scarcity esakal
जळगाव

Jalgaon News: पाणीटंचाईसाठी अडीच कोटींचा आराखडा तयार; जिल्ह्यातील 432 गावांसाठी जिल्हा प्रशासनाची सतर्कता

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात यंदा ११० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच सिंचन प्रकल्पात पाणीसाठा पुरेसा आहे. पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र तूर्त आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेकडून संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करवून घेतला आहे.

त्यानुसार ४३२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे. दोन कोटी ३३ लाखांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. (Two half crore plan ready for water shortage Vigilance of district administration for 432 villages in district Jalgaon News)

गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे पाणीटंचाईची गावे कमीच असतात. यंदाही पाऊस १०० टक्क्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर या मोठ्या प्रकल्पांसह लहान प्रकल्पांमध्येही चांगला पाणीसाठा आहे. यामुळे टंचाईची परिस्थिती नाही.

मात्र, आपल्याकडील उन्हाळा अतिशय कडक असतो. तापमान ४० ते ४८ अंशादरम्यान असते. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू शकते. ऐनवेळी उपाययोजना करण्यापेक्षा आतापासूनच उपाययोजना केल्या तर ऐनवेळी पंचाईत नको, म्हणून संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

मागील चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. यामुळे टंचाई आराखडा १३ ते १५ कोटींच्या घरात जात होता. यंदा भरपूर पाणीसाठा आहे. पाणीटंचाईची स्थिती गृहीत धरून आराखडा अडीच कोटींपेक्षा कमी रक्कमेचा तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दुसऱ्या टप्प्यात ३२० गावे

जिल्ह्यात ४३२ गांवात संभाव्य पाणीटंचाई होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११२ गावे, तर दुसऱ्या टप्प्यात ३२० गावांचा सामावेश आहे. या गावांसाठी २ कोटी ३३ लाखांचा टंचाई आराखडा आहे. या गावांमध्ये कूपनलिका तयार करणे, नवीन विंधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, खासगी विहीर अधिग्रहित करणे, विहीर खोली करणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे, टँकर, बेलगाडीने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

ही आहेत संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या

तालुका----गावे

जळगाव--७

भडगाव--१७

भुसावळ--८

बोदवड--१२

चाळीसगाव--३४

चोपडा--७६

धरणगाव--२८

एरंडोल--१५

जामनेर--७५

मुक्ताईनगर--१९

पाचोरा--२५

पारोळा--२८

रावेर--८

यावल--१२

एकूण--४३२

चोपडा, जामनेरला सर्वाधिक गावे

सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे चोपडा तालुक्यात ७६, त्या खालोखाल जामनेर तालुक्यात ७५ गावे आहेत. सर्वांत कमी गावे जळगाव तालुक्यात सात, रावेर व भुसावळ तालुक्यात ८ गावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

Shashi Tharoor absence from Rahul Gandhi meeting : राहुल गांधींच्या बैठकीला शशी थरूर सलग तिसऱ्यांदा गैरहजर ; चर्चांना उधाण!

Cabinet Decision: जनगणनेसाठी मोठं बजेट मंजूर; ऊर्जा सुधारणा आणि कृषी क्षेत्रात बदल अन्..., केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Mumbai Viral Video: अरे संसार संसार, पण शौचालयात कसा थाटला? मुंबईत धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

"माझ्याकडे घरही नव्हतं आणि डॉक्टरांनी.." सोनाली बेंद्रेने सांगितला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचा अनुभव

SCROLL FOR NEXT