Sucide Case esakal
जळगाव

Jalgaon News : वर्षाचा पहिलाच सूर्योदय अन्‌ घरचा दिवा विझला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने मध्यरात्रीनंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. १) वर्षाचा पहिला दिवस उजाडल्यावर मुलाला उठवायला खोलीत गेलेल्या आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलगा दिसताच तिने एकच हंबराडा फोडत आक्रोश केला. मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मनोहर कैलास गायकवाड तांबापुरा परिसरात आई-वडील आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. मिळेल ते काम करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. ३१ डिसेंबरला रात्री अकराला मनोहर जेवण करून घराच्या मागच्या खोलीत झोपायला गेला. मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. (Young son attempt suicide in starting of new year suicide behind reason is love matter jalgaon news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

रविवारी (ता. १) सकाळी आठपूर्वी आई राधाबाई मनोहरला उठविण्यासाठी हाका मारत होत्या. तो प्रतिसाद देत नसल्याने त्या खोलीत गेल्या. तेथे लटकलेल्या अवस्थेत मनोहरचा मृतदेह पाहून राधाबाई यांनी आक्रोश करत हंबरडा फोडला.

त्यांच्या आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. तत्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात नेला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक नितीन पाटील, तुषार गिरासे तपास करीत आहेत.

प्रेमप्रकरणातूनच टोकाचे पाऊल?

दरम्यान, मनोहर गायकवाड काही दिवसांपासून एमआयडीसीतील एका कारखान्यातही रोजंदारीवर जात होता. व्हॉटस्‌ॲप-फेसबुकवर नवे स्टाईलीश फोटो टाकून कमेंट मिळवणे, मित्रांच्या चर्चेत राहायला त्याला आवडत असे. नेहमी आनंदी, उत्साही असणारा मन्या सहजासहजी, असे पाऊल उचलणारच नाही, असा त्याच्या ओळखीच्या तरुणांना विश्वास आहे. प्रेमप्रकरणातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असाही संशय व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT