kokan railway sakal
कोकण

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण वेगात ; रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनची दुसरी चाचणी पूर्ण

कोरे मार्गावर काम वेगाने; रत्नागिरी-मडगाव गाडी २ फेब्रुवारीपर्यंत रद्द, पुन्हा चाचणी घेणार

सकाळ वृत्तसेवा

कोरे मार्गावर काम वेगाने; रत्नागिरी-मडगाव गाडी २ फेब्रुवारीपर्यंत रद्द, पुन्हा चाचणी घेणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गांवरील वेर्णा-कारवार दरम्यान विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून, इलेक्ट्रिक इंजिनची दुसरी चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली. हा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या याच टप्प्यातील टनेलमधील कामांसाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी २ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती रद्द केली आहे.

विद्युतीकरणाच्या कामाअंतर्गत रत्नागिरी ते वेर्णा दरम्यानचे काम वेगाने केले जात आहे. ते काम पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण होईल. गतवर्षी रोहा-रत्नागिरी हा रेल्वे मार्ग विजेवर चालणाऱ्‍या गाड्यांसाठी सज्ज झाला आहे. परंतु जोपर्यंत संपूर्ण मार्ग विद्युतीकरणासाठी सज्ज होत नाही, तोपर्यंत डिझेल इंजिनचा वापर केला जात आहे. सध्या या मार्गांवर मालगाड्या विद्युत इंजिनवर धावत आहेत. रत्नागिरी-वेर्णा दरम्यान मार्गातील टनेलमधील विद्युत यंत्रणा तपासली जात आहे. त्यासाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही पुढे मडगावकडे नेण्यात येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

एक नजर...

  1. रत्नागिरी ते वेर्णा दरम्यानचे काम वेगाने

  2. कोकण रेल्वेचा मार्ग विद्युतीकरण होणार

  3. रोहा-रत्नागिरी विजेवरील गाड्यांसाठी सज्ज

  4. पहिल्या टप्प्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च

  5. रत्नागिरी-वेर्णा दरम्यान टनेलमधील यंत्रणेची तपासणी

  6. रत्नागिरी-मडगाव ही गाडी रद्द करण्याचा निर्णय

  7. रत्नागिरी ते वेर्णा मार्गावर विद्युत ट्रेनची दुसरी चाचणी

  8. त्रुटी, दुरुस्त्या पूर्ण करणार; पुन्हा चाचणी घेणार

...तिथे आपत्कालीन यंत्रणा आवश्यक

कोकण रेल्वेच्या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू असून, भविष्यात रेल्वे यावरच धावणार आहे. हा मार्ग जंगलातून गेला आहे. वन्यपशू आणि माकडे यांच्यामुळे विद्युत प्रवाह खंडित (वायर ट्रिपिंग) होण्याचे प्रकार होऊ शकतात. पुरवठा खंडित झाला की गाडी १०० मीटरमध्ये जाऊन थांबते. अशी ठिकाणे निश्‍चित करून तेथे आपत्कालीन यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे.इंजिन फेल्युअर झाले तर पिगबॅक करायला बॅकअप डिझेल इंजिनही लागेल. यादृष्टीने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

सुरुवातीला काही काळ मालगाड्यांची वाहतूक

कोकणी जनतेचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कोकण रेल्वेचे विद्युतीकरण(kokan railway eletric) पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रवासी गाड्यांऐवजी सुरुवातीला काही काळ मालगाड्यांची वाहतूक विद्युत इंजिने(eletric engine)लावून केली जाणार आहे. त्यानंतर प्रवासी गाड्यांना विजेवर चालणारी इंजिने लावली जातील.विद्युत इंजिने काम करतील, तेव्हा कार्यपद्धतीत बदल झाल्याने काही धोके निर्माण होणार आहेत. त्याचा विचार करून कोकण रेल्वेने जागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

दुरुस्त्या पूर्ण केल्या जातील...

१२ जानेवारीला रत्नागिरी ते वेर्णा मार्गावर विद्युत ट्रेन (eletric train)चालवण्याची दुसरी चाचणी घेण्यात आली. यामधील त्रुटी किंवा दुरुस्त्या येत्या काही दिवसांत पूर्ण केल्या जातील. त्यानंतर पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे.(kokan rail)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

Latest Marathi News Live Update : मेट्रो वन मार्गावर बिघाड, अर्धा तासापासून मेट्रो साकीनाका स्थानकात खोळंबली

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT