कोकण

कोरोना चाचण्यांबाबतच्या नोंदींनी दिशाभूल! संगमेश्वरमध्ये प्रतिबंधित पाच गावे

सकाळ वृत्तसेवा

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कसबा, नावडी, माभळे, धामणी आणि साखरपा ही गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. या सर्व गावांमध्ये कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली.

संगमेश्वर (रत्‍नागिरी) : तालुक्यातील पाच गावे प्रतिबंधित जाहीर करून तेथे सरकारी यंत्रणा स्वॅब टेस्टिंग मोहीम (swab testing campaign) राबवत आहे. मात्र या पाचही गावांबाबतच्या धोरणांत आणि त्यासाठी उचललेल्या पावलांच्या संबंधी कोणत्याही तऱ्हेची पारदर्शकता नाही. यामुळे बाजारपेठा असलेले नावडी, संगमेश्वर तसेच कोंडगाव येथील व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. चाचण्यांची नोंद करताना त्यात चुकीची माहिती दिली जात आहे. हे जाणीवपूर्वक घडत आहे, असा आरोप केला जात आहे. या चुकीच्या नोंदी मंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढले; मात्र तरीही चुकीच्या नोंदी केल्या जात आहेत. त्यामुळे यात हेतू तरी काय? अशी चर्चा सुरू आहे.(five villages in sangameshwar taluka have been declared banned and the government is conducting a swab testing campaign there)

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कसबा, नावडी, माभळे, धामणी आणि साखरपा ही गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. या सर्व गावांमध्ये कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली. त्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत घेण्यात येऊन गावातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले गेले.

प्रत्यक्षात ज्या वेळी या गावातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले, त्यावेळी त्यांच्या एसआरएफवर (specimen Referral form) नॉन कंटन्मेंट झोन आणि टेस्ट ऑन डिमांड, असे लिहिले जात आहे. लसीकरण झाले आहे, असे स्वॅब देणाऱ्याने सांगितल्यावरही लसीकरण झालेले नाही, असे लिहिले जात आहे. ही गोष्ट पत्रकारांनी मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या व चूक दुरुस्त करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालण्याचे व चूक सुधारण्याचे आश्वासन दिले. हे पत्रकार परिषद सुरू असताना झाले; मात्र त्यानंतरही यामध्ये सुधारणा झाली नाही. याचा अर्थ चुकीच्या नोंदी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का? असा संशय व्यक्त होत आहे.

वेगळी माहिती भरायची आणि वेगळे सांगायचे...

आज चाचणी झाल्यानंतरही आलेल्या एसआरएफवर सुद्धा चुकीच्या नोंदी केल्या गेल्या आहेत. आयसीएमआरच्या चाचणीच्या निकषांमध्ये पाच गावातील नागरिक येत नाहीत; मात्र जबरदस्तीने यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच आयसीएमआरच्या प्रतिबंधित गावांच्या निकषांमध्येही ही गावे येत नाहीत. तरीसुद्धा त्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले गेले आहे. आयसीएमआरच्या कागदपत्रांत वेगळी माहिती भरायची आणि लोकांना वेगळे सांगायचे, असे सातत्याने अशी एकूण पद्धत सुरू आहे.

ते आयसीएमआर प्रमाणित आहे का..

कारभारातील पारदर्शकतेबाबत आक्षेप घेताना पाच गावांच्या प्रतिबंधित क्षेत्राचा जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाची पोस्ट व्हायरल झाली आहे. ते आयसीएमआर प्रमाणित आहे का आणि त्यामध्ये सांगितल्यानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग अडीच महिन्यानंतरसुद्धा होण्याची शक्यता असते का? याबाबतची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे. (five villages in sangameshwar taluka have been declared banned and the government is conducting a swab testing campaign there)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT