Jagbudi River esakal
कोकण

Rain Update : 'जगबुडी'ने ओलांडली धोक्याची पातळी; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, बंदररोड पाण्याखाली

खेड शहरासह तालुक्यातील (Khed) ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

खेड तालुक्यातील नातूवाडी धरणक्षेत्रात गेल्या २४ तासांत ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण १२१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

खेड : शहरासह तालुक्यातील (Khed) ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, जगबुडी नदीने ७ मीटर (Jagbudi River) ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरानजीक वाहणाऱ्या या नदीचे पाणी वाढल्याने किनाऱ्यावरील बंदररोड पाण्याखाली गेला आहे.

पुराचे पाणी पालिकेच्या मटण-मच्छी मार्केट येथे आल्याने नागरिक धास्तावले आहेत. अतिवृष्टी सुरूच असल्याने प्रशासन पूरस्थिती उद्‌भवल्यास सामोरे जाण्यासाठी सतर्क झाले आहेत. गुरुवारी (ता. ६) सकाळी ८ ते शुक्रवारी (ता. ७) सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत खेडमध्ये ६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात एकूण ६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी ११ वाजता जगबुडी नदीने ६.७५ मीटर पातळी गाठल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांना तसेच खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला.

अतिवृष्टीची परिस्थिती पाहता शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावे म्हणून नियोजित वेळेपूर्वीच पालकांसोबत संपर्क साधून घरी पाठवले. आज दुपारी १२ वाजल्यापासून जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी पालिकेच्या मटण-मच्छी मार्केट परिसरात शिरले.

तर नारिंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे खेड-दापोली मार्गालगतची भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पाणीच पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.

अतिवृष्टी सुरूच असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे ग्रामीण भागातदेखील नागरिक धास्तावले आहेत. नदी किनाऱ्यावर बहुतांश भातशेती असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरद, नारिंगी, सोनपात्रा आदी उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नुकत्याच केलेल्या लावणीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

नातूवाडी धरणात १३.०५९ दशलक्ष घनमीटर साठा

खेड तालुक्यातील नातूवाडी धरणक्षेत्रात गेल्या २४ तासांत ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण १२१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणात १३.०५९ दशलक्ष घनमीटरएवढा पाणीसाठा झाला आहे. धरण ४७.९६ टक्के भरले असून, अतिवृष्टीमुळे त्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खेड-शिवतर वाहतूक वृक्ष कोसळल्याने ठप्प

खेड-शिवतर रोडवरील मुरडे येथे महाकाय वृक्ष कोसळल्याने खेड-शिवतर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील नागरिकांनी हे झाड तोडून मार्ग मोकळा केला. बाजारपेठेतील राष्ट्रीय मारुती मंदिराशेजारील पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने बाजारपेठेतील विद्युतप्रवाह खंडित झाला. शहरातील व्यापारी, महावितरण कर्मचाऱ्यांनी फांदी बाजूला करून विद्युतप्रवाह सुरळीत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

Latest Marathi News Live Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई, भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

SCROLL FOR NEXT