Sindhudurg flood Collector Manjulakshmi  esakal
कोकण

Sindhudurg Flood : येत्या दोन दिवसांत मुसळधार; जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गवासियांना केलं 'अलर्ट', पूरस्थितीची शक्यता!

येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य वेळीच व्हावे यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

सावंतवाडी : येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून तशाप्रकारे इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी सोमवारपर्यंत (ता.२४) सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे केले.

आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य वेळीच व्हावे यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यासाठी तालुकावार तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण केले आहेत. यामार्फत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली चार तालुक्यांची आपत्कालीन आढावा बैठक आज येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार श्रीधर पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात आजपासून काहीसा पाऊस ओसरला तरी, पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेले दोन दिवस जिल्हा ‘यलो अलर्ट’मध्ये होता. आज ‘ग्रीन अलर्ट’मध्ये आला असला तरी, सोमवारपर्यंत (ता.२४) नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

या काळात नदी, ओहोळ आदी परिसरात कपडे धुण्यासाठी तसेच छायाचित्र घेण्यास जाणे टाळावे. तालुक्यातील तेरेखोल नदी तसेच कुडाळ कर्ली नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली असली तरी, स्थानिक यंत्रणेकडून तेथील नागरिकांना सतर्क केले होते. आवश्यक असल्यास स्थलांतराच्या सूचनाही दिल्या होत्या. अशा प्रकारची गरज भासल्यास जिल्हा परिषद शाळा उपलब्ध करून देण्याची सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यात काल पूरप्रवण प्रभागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे कुठेच मोठी हानी झाली नाही. नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याचे काम तसेच पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘रायगड-इर्शाळवाडी येथील डोंगर खचण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिरशिंगे, सरंबळे व दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, वेंगुर्ले-तुळस येथील दरडी कोसळण्याच्या ठिकाणी सुरक्षिततेचा भाग म्हणून तहसीलदारांकडून पाहणी केली आहे.

शिवाय तेथील नागरिकांना स्थलांतराचीही विनंती केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील नदी, नाले, कॉजवेवरील पुलांचे ऑडिट करण्यात येणार आहे. तशा सूचनाही दिल्या असून, लवकरच हा सर्व्हे हाती घेण्यात येईल. ग्रामीण भागातील तसेच मुख्य रस्त्यावरील धोकादायक झाडे हटविण्याच्या सूचनाही बांधकाम विभागाला दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील धोकादायक झाडेही हटविण्यात येणार असून, सर्व्हे सुरू आहे.

आंबोली घाट तसेच शिरशिंगे परिसरातील दरडीच्या ठिकाणी उपाययोजना म्हणून आपत्कालीन निधीतून खर्च करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.’’ या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता गोविंद श्रीमंगले, तिलारी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विनायक जाधव.

तसेच जिल्हा परिषद बांधकामचे अभियंता अनिल आवटी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कुडाळ तहसीलदार अमोल फाटक, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, उपविभागीय अधिकारी संध्या गावडे, सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, प्रधानमंत्री ग्रामसडक श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

तिलारी धरण क्षेत्रातील आठ गावांना इशारा

तिलारी धरण प्रकल्प ७० टक्के भरला असून, उद्यापर्यंत ८० टक्क्यांपर्यंत पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरण क्षेत्रातील सात ते आठ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT