Swapnali Sawant Murder Case  esakal
कोकण

Swapnali Sawant खून प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा सुगावा, वर्षानंतर सापडला 'हा' पुरावा

गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीच्या सनरुफच्या कप्प्यात हा मोबाईल सापडला.

सकाळ डिजिटल टीम

खुनादरम्यान स्वप्नाली सावंत यांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून मोबाईल विहिरीत टाकला होता.

Ratnagiri Crime : स्वप्नाली सावंत खून प्रकरणात (Swapnali Sawant Murder Case) आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित मुख्य आरोपीने पोलिसांची (Ratnagiri Police) दिशाभूल करण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना वर्षानंतर यश आले.

एका निनावी पत्राने याचा उलगडा झाला आहे. गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीच्या सनरुफच्या कप्प्यात हा मोबाईल सापडला. याचे कॉल तपासून कोणी खुनाच्या गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या खूनप्रकरणी एक एक माहिती पोलिसांच्या पथ्यावर पडत आहे. या आधी घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मांस आणि दाताचा डीएनए जुळला असल्याने तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वप्नाली यांचा मोबाईल पोलिसांना सापडत नव्हता.

पोलिस त्या मोबाईलच्या शोधात होते. नंतर तो पोलिसांना विहिरीत सापडला होता; मात्र त्यातून अपेक्षित काही मिळू शकले नाही; परंतु एका निनावी पत्राने पोलिसांचे हे काम सोपे केले. हा मोबाईल भाई सावंत यांच्या गाडीच्या सनरुफच्या कप्प्यामध्ये असल्याचे पत्रात म्हटले होते. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, तो मोबाईल पोलिसांना सापडला आहे.

खुनादरम्यान स्वप्नाली सावंत यांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून मोबाईल विहिरीत टाकला होता. त्यानंतर मुख्य संशयित आरोपी भाई सावंत यांनी नवीन मोबाईल घेऊन तो गाडीच्या सनरुफमध्ये लपवून ठेवला होता. त्यामुळे स्वप्नाली सावंत हिचे लोकेशन हरचिरी, लांजा या दरम्यान दाखवले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य संशयिताने हा कट रचला होता.

या मोबाईलमधील सीम पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा सीडीआर काढला जाणार आहे. यातून घटनेच्या दरम्यान ज्यांचे ज्यांचे कॉल झाले आहेत किंवा आले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्यापैकी कोण सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर त्यालाही आरोपी करून पुरवणी दोषारोपपत्र दिले जाणार आहे.

राख गोणपाटात भरून टाकली

पोलिसांनी यापूर्वीच यातील मुख्य संशयित आरोपी सुकांत गजानन सावंत, रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग यांना अटक केली आहे. खून केल्यानंतर स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह जाळून त्याची राख गोणपाटात भरून टाकली जात होती. बहुतांश राख समुद्रात टाकली. परंतु थकल्यानंतर संशयितांनी उर्वरित राख घराच्या बाजूला टाकली होती. त्यामध्ये पोलिसांना स्वप्नाली सावंत यांची जोडवी, मांस आणि दात सापडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT