IPL Mega Auction 2022
IPL Mega Auction 2022 esakal
क्रीडा

IPL Mega Auction कडे 'या' खेळाडूंनी फिरवली पाठ!

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेत भारताने कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली. मात्र इकडे भारतात बीसीसीआय (BCCI) वेगळ्याच मूडमध्ये आहे. बीसीसीआय आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनच्या (IPL Mega Auction) तयारीला लागली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) आठ नाही तर दहा संघ सहभागी होणार आहेत. तसेच आयपीएल संघ येती चार ते पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून आपली संघबांधणी करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघात मोठे आऊटगोईंग आणि इनकमिंग होणार आहे. काही खेळाडूंनी या आयपीएल मेगा ऑक्शनकडे पाठ देखील फिरवली आहे.

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज द युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल (Chris Gayle), ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी मेगा ऑक्शनसाठी नोंदणी केलेली नाही. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडचे जोफ्रा आर्चर (Jofra Archer), ख्रिस वोक्स आणि सॅम करन (Sam Curran) यांनी देखील लिलावाकडे पाठ फिरली आहे. बहुदाअ‍ॅशेसमध्ये सपाटून मार खालल्यानंतर इसीबीने आयपीएलवर याचे खापर फोडले आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner), रवीचंद्रन अश्विन (R. Ashwin), ड्वेन ब्राव्हो यांनी आपली बेस प्राईस २ कोटी रूपये ठेवली आहे. याचबरोबर मिचेल मार्श, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांनी देखील आपली बेस प्राईस २ कोटी रूपये ठेवली आहे.

तसेच पॅट कमिन्स, शाकिब - अल - हसन, ट्रेंट बोल्ट, स्टीव्ह स्मिथ, क्विंटन डिकॉक, कसिगो रबाडा यांनी देखील स्वतःला २ कोटी बेस प्राईस विभागात ठेवले आहे. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), कुलदीप यादव, टी नटराजन, वानिंदू हसरंगा, मारक्रम आणि तबरेज शामसी यांनी स्वतःची बेस प्राईस १ कोटी ठेवली आहे.

आयपीएल लिलावासाठी (IPL Auction) खेळाडूंची नोंदणी २० जानेवारीपर्यंत करायची होती. यात एकूण १ हजार २१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात ८९६ भारतीय तर ३१८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. फेब्रुवारीच्या १२ आणि १३ तारखेला होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction) १० संघ नोंदणी केलेल्या खेळाडूंमधून आपला संघ तयार करतील. यात २७० कॅप खेळाडू आणि ९०३ अनकॅप खेळाडू आहेत. तर ४१ असोसिएट खेळाडू असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT