Dinesh Karthik Statement About KL Rahul Captaincy
Dinesh Karthik Statement About KL Rahul Captaincy esakal
क्रीडा

कार्तिककडून राहुलचे कौतुक; 'डोके खाजवण्याची वेळ आली होती, पण..'

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत के.एल. राहुल (KL Rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावात संपवला. जरी दक्षिण आफ्रिकेकडे २७ धावांची आघाडी असली तरी भारताने या कसोटीवर (Test Cricket) आपली पकड ठेवण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलसाठी हा सामना आव्हानात्मक ठरला. विराट कोहलीची (Virat Kohli) अनुपस्थितीत मधल्या फळीचे टेन्शन होते. त्यातच मोहम्मद सिराजला दुखापत झाल्यामुळे भारताला मोक्याच्या वेळी एक गोलंदाज शॉर्ट पडला. (Dinesh Karthik Statement About KL Rahul Captaincy)

अशा सर्व विपरीत परिस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. याबाबत भारताचा माजी विकेटकिपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) समालोचन करताना आपले मत व्यक्त केले. दिनेश कार्तिक म्हणाला, 'मला वाटते त्याने चांगले नेतृत्व केले. त्याच्यासमोर काही अडचणी उभ्या राहिल्या होत्या. सिराज दुखापतग्रस्त झाला होता. तुमचा एक गोलंदाज गोलंदाजी करु शकत नाही त्यावेळी एक कर्णधार म्हणून तुमचे काम सोपे नसते. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर राहुलवर डोके खाजवण्याची वेळ आली होती. पण, गोलंदाजांनी छान गोलंदाजी केली. ज्यावेळी तुम्हाला विकेट मिळत नाहीत त्यावेळी कर्णधार अजून मी आता काय करु अशी स्थिती निर्माण होते. तुम्ही काही वेगळे करता येते का याचा विचार करण्याचा प्रयत्न करतात. मला असे वाटते की के.एल. राहुलने (KL Rahul Captaincy) याचे दडपण घेतले नाही. त्याचे फळ त्याला नंतरच्या सत्रात फायदाच झाला.'

याचबरोबर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केएल राहुलने गोलंदाजीत केलेल्या बदलांचेही कौतुक केले. तो म्हणाला, 'त्याने परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. सहाजिकच आहे तो फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये आहे याचा त्याला फायदाच झाला. त्याने जे बदल केले. त्याची यामगची रणनिती योग्य होती. तो कायम शांत कर्णधार वाटतो. तो स्वभावाने भावनिक आहे. मात्र त्याच्या भावना मैदानावर दिसून येत नाहीत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT