Body Builder Cedric McMillan Passed Away
Body Builder Cedric McMillan Passed Away Sakal
क्रीडा

जिममध्ये व्यायाम करताना प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मॅकमिलन (Cedric McMillan) यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले आहे. रिपोर्टनुसार, ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मॅकमिलन हृदयाशी संबंधित समस्या तसेच आणि दीर्घ कोविड समस्यांशी झुंज देत होते. या प्रसिद्ध बॉडीबिल्डरच्या मृत्यूची बातमी त्याच्या एका प्रायोजकाने दिली.

अमेरिकेत राहणारे सेड्रिक मॅकमिलन हे एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर तसेच यूएस आर्मीचे इंस्ट्रक्टर होते. 2017 मध्ये अरनॉल्ड क्लासिक बॉडीबिल्डिंगचा किताब (Arnold Classic Bodybuilding Title) जिंकून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली. (Famous bodybuilder Cedric McMillan was running on the treadmill, died of heart attack)

ट्रेडमिलवरच आला हृदयविकाराचा झटका-

जनरेशन आयर्नच्या रिपोर्टनुसार, बॉडीबिल्डर मॅकमिलनला जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मॅकमिलनला कोविड-19 चा बराच काळ त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. 2020 मध्ये बरे झाल्यानंतरही लाँग कोविडशी संबंधित समस्यांना तोंड देत होते. याशिवाय त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. त्यांना एक-दोनदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.

28 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅकमिलनने त्यांच्या शरीराशी संबंधित काही समस्या स्पष्ट केल्या. ते म्हणाले होते, 'मी काही कारणास्तव आत अन्न ठेवू शकत नाही. मी जेव्हा काही खातो किंवा पितो तेव्हा उचक्या यायला लागतात. पोटात काहीही थांबत नाही.

मॅकमिलन प्रायोजित करणार्‍या कंपनी ब्लॅक स्कल यूएसएने (Black Skull USA) बुधवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. कंपनीने लिहिले की, तुम्‍हाला कळवण्‍यास खेद वाटतो की आमचा मित्र आणि भाऊ सेड्रिक मॅकमिलन यांचे आज निधन झाले. अ‍ॅथलीट, मित्र आणि वडील म्हणून सेड्रिकची खूप आठवण येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT