https://www.esakal.com/topic-tags/surya-kumar-yadav 
क्रीडा

IND vs NZ: फक्त 1 चौकार, स्ट्राईक रेटही 100 पेक्षा कमी अन्...! तरीही सूर्या 'प्लेयर ऑफ द मॅच'

Kiran Mahanavar

Ind vs Nz 2nd T20 Suryakumar Yadav : लखनौ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. यासह त्याने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाने आपल्या फिरकीपटूंच्या जोरावर त्यांना 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावांत रोखले.

हे लक्ष्य सोपे वाटत होते पण जेव्हा टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या अडचणी वाढतच गेल्या. याचा परिणाम असा झाला की भारताने हे लक्ष्य एक चेंडू आधी गाठले. सूर्यकुमार यादवने यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने या सामन्यात खास खेळी केली.

सूर्याने 360-डिग्री अवतार धारण करून मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार आणि षटकार मारावेत असे चाहत्यांना वाटेल. परंतु असे काहीही दिसले नाही. असे असूनही केवळ 26 धावा करणाऱ्या त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

टी-20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनौमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 31 चेंडूत फक्त 26 धावा केल्या, ज्यात फक्त एक चौकार समाविष्ट होता. या खेळीसाठी सूर्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे घडले?

सूर्यकुमार यादव यांचा वेगळा अवतार पाहायला मिळाल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सूर्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला, कारण भारतासमोर केवळ 100 धावांचे लक्ष्य होते, परंतु ते साध्य करताना भारताची दमछाक झाली. या खेळपट्टीवरून न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना भारतापेक्षा जास्त मदत मिळत होती आणि चेंडू असे वळण घेत होते की फलंदाज खेळू शकत नव्हते.

सूर्यकुमार यादवलाही त्याचे शॉट्स खेळता आले नाहीत. त्यामुळे त्याने वेगळा मार्ग स्वीकारला. त्याने स्ट्राईक रोटेट करण्यास सुरुवात केली, जेणेकरून एक-दोन धावांच्या जोरावर लक्ष्य गाठता आले. यात तो सक्षमही होता. अवघ्या एका चौकाराच्या जोरावर त्याने 26 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 15 धावा केल्या. भारताने 20 व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले. शेवटच्या 6 चेंडूत 6 धावांची गरज होती, जी भारताने 5 चेंडूत पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I लढतीपूर्वी दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती; म्हणाला, हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ...

Viral Video: ट्रेन, प्रवासी अन् महाकाय अजगर… तिघांची LIVE जुगलबंदी! हावडा मेलच्या स्लीपर कोचमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाब दौऱ्यावर

Nagpur : कोट्यवधींची बिलं थकीत, हिवाळी अधिवेशनाआधी कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन

PMC News : पुणे शहरात स्वच्छतेसाठी महापालिकेची नवी मोहीम; ओला-सुका कचरा वर्गीकरणावर भर

SCROLL FOR NEXT