अर्शदीप सिंगने साधली नो-बॉलची हॅट्ट्रिक...
ind vs sl 2nd t20 hardik pandya angry covers face hands arshdeep singh
अर्शदीप सिंगने साधली नो-बॉलची हॅट्ट्रिक... ind vs sl 2nd t20 hardik pandya angry covers face hands arshdeep singh  
क्रीडा

IND vs SL: अर्शदीपच्या कृतीमुळे हार्दिक नाराज; 'तोंड दाखवायला कुठेच ठेवली नाही जागा'

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 2nd t20 :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ 190 धावा करता आल्या.

टी-20 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पांड्याला आतापर्यंत फारसा त्रास झालेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने खेळलेले बहुतांश सामने जिंकेल आहेत. पुण्यातील श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्यांना निश्चितच खडतर कसोटीला सामोरे जावे लागले, जेथे श्रीलंकेच्या उत्कृष्ट फलंदाजीशिवाय भारतीय गोलंदाजांच्या अनुशासनहीनतेने संघाचे नुकसान केले. विशेषत: युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने हीच चूक इतक्या वेळा पुनरावृत्ती केली की हार्दिक पांड्याने मैदानात तोंड लपवले.

टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. अर्शदीप पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग डावाच्या दुसऱ्याच षटकात गोलंदाजीसाठी आला. पहिल्या 5 चेंडूंनंतर त्याने नो-बॉलचा एवढा धुव्वा उडवला की सगळेच अवाक् झाले. अर्शदीपने शेवटच्या चेंडूआधी सलग 3 नो बॉल टाकून नकोशी हॅट्ट्रिक साधून श्रीलंकेला 13 धावा दिल्या. या षटकात एकूण 19 धावा आल्या.

अर्शदीप सिंगची अशी गोलंदाजी पाहून कर्णधार हार्दिकने बराच वेळ त्याला पुन्हा ओव्हर दिली नाही. डावाच्या 19व्या षटकात अर्शदीपला माघारी बोलावण्यात आले. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात निपुण असल्याचे सिद्ध झालेल्या अर्शदीपकडून यावेळी चांगली गोलंदाजी अपेक्षित होती, पण नंतर नो-बॉलच्या चुका पुन्हा करून त्याने नुकसान केले. यातील एका चेंडूवर दासुन शांकाचा झेल सुटला, पण तो नो-बॉलमुळे वाचला. ही स्थिती पाहून रागाच्या भरात आणि निराशेने कॅप्टन हार्दिकने आपले डोके पकडून हाताने तोंड झाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT