MS Dhoni And Parvati Nair
MS Dhoni And Parvati Nair  Sakal
क्रीडा

दाक्षिणात्य अभिनेत्रीचं धोनी प्रेम; माहीचा फोटो शेअर करत म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामाची उत्सुकता आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं (CSK) सूरतमध्ये सराव सत्रालाही सुरुवात केलीये. कर्णधार महेंद्र सिंह धोनीही या सरावाला हजेरी लावताना दिसते. सीएसकेच्या खेळाडूंचे सरावा दरम्यानचे फोटोही समोर येत आहेत. त्यात दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल पार्वती नायरच्या (Parvati Nair) एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. पार्वतीने धोनीचा एक फोटो ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय.

पार्वतीने खास कॅप्शनसह शेअर केलाय फोटो

पार्वतीने फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिल आहे. तिने लिहिलंय की, आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होत आहे. नवे संघही यंदाच्या हंगामात दिसतील. पण सगळ्यांचे लक्षे फक्त एकाकडेच असेल.आयपीएल 2022 च्या हंगामात ओन्ली वन महेंद्रसिंह धोनी. पार्वतीने जो फोटो शेअर केलाय त्यात धोनी नेट्समध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते.

याआधीही पार्वतीनं दाखवलं होते धोनीवरील विराट प्रेम

मागील हंगामातही पार्वती नायरच्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली होती. तिने विराचट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला होता. या दोघांमधील मैत्री अतूट आणि प्रेमळ आहे, असा उल्लेख तिने केला होता.

कोण आहे पार्वती नायर?

पार्वती नायर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय सोशल मीडियावरही ती चांगली प्रसिद्ध आहे. पार्वती नायरने 2012 मध्ये मल्याळम चित्रपट पॉपिन्स (Poppins) मधून कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'स्टोरी काथे' (Story Kathe) या चित्रपटात तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT