Deepak Chahar Message Fans sakal
IPL

'IPL 2022' मधून आऊट झाल्यानंतर दिपक चहर भावूक; चाहत्यांसाठी खास संदेश

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दीपक चाहर दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे.

Kiran Mahanavar

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. आयपीएल मधून बाहेर पडल्यानंतर त्याने चाहत्यांसाठी एक भावनिक असा मेसेज लिहिला आहे. आयपीएल खेळू न शकल्याने चाहत्यांची माफी मागितली आहे. लवकरात लवकर बरा होऊन क्रिकेटमध्ये परतणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. चाहरने त्याच्या ट्विटर हॅण्डल अकाउंट वरून हे पोस्ट केले आहे. मेसेजमध्ये लिहिले आहे की, मला माफ करा. दुखापतीमुळे मी आयपीएलच्या या हंगामात खेळू शकणार नाही. मला खेळायचे होते पण हे काय होऊ शकले नाही. आता मी अधिक तयारी करेल आणि मजबूत होऊन परत येईन. आपल्या प्रेमासाठी आणि समर्थनाबद्दल खरंच आभार मानतो. मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. असे ट्विट केले आहे.(IPL 2022 | Deepak Chahar Update)

दीपक चहरला कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T-20 मालिकेदरम्यान पायाला दुखापत झाली होती. दीपकच्या क्वाड्रिसेप्स स्नायुना दुखापत झाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे उपचार घेत होता. पायाची दुखापत झपाट्याने बरी होत आले होते, पण तेव्हाच दीपकच्या पाठीला दुखापत झाली.

आयपीएल मेगा लिलावात दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या हंगामातील लिलावात चहर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. गेल्या हंगामात दीपक चेन्नईचा एक भाग होता, पण फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. मेगा ऑक्शनमध्ये मोठी बोली लावून दीपकला पुन्हा संघात सामील करण्यात आला.

दीपकच्या अनुपस्थितीचा चेन्नई संघाला मोठा झटका बसला आहे. आता संघाचे वेगवान गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. त्यामुळेच या हंगामाच्या सुरुवातीला चेन्नई एकापाठोपाठ एक सलग चार सामने हरले आहे. दीपक संघात असता तर गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही त्याचा संघाला खूप फायदा झाला असता. दीपक केवळ डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करत नाही, तर त्यासोबतच त्याच्यात फलंदाजीतही मोठे फटके मारण्याची ताकद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT