IPL Auction 5 Indian Players Poor Performance after Got Highest Bidding esakal
IPL

IPL Auction: या 5 भारतीय खेळाडूंवर 'छप्पर फाड के' बोली लावून फ्रेंचायजी फसली

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलचा मेगा लिलालव (IPL Mega Auction 2022) 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. यंदाच्या लिलावात सर्व 10 संघांना आपल्या संपूर्ण संघांची बांधणी नव्याने करायची आहे. काही संघांनी 4 तर काही संघांनी 3, 2 असे खेळाडू रिटेन करून ठेवले आहेत. अनेक फ्रेंचायजींनी आपल्या पहिल्या पसंतीच्या खेळाडूंना चांगली रक्कम दिली आहे. आता या फ्रेंचायजी मेगा लिलावात (IPL 2022 Auction) इतर खेळाडूंवर किती मोठी बोली लावतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे नसल्याचे आयपीएल इतिहासात (IPL Auction History) डोकावले तर दिसून येते की, फ्रेंचायजींना एकाच खेळाडूवर छप्पर फाड के बोली लावण्याचा फारसा फायदा झालेला नाही. आपण अशाच 5 भारतीय खेळाडूंची याती पाहणार आहोत. ज्यांच्यावर फ्रेंचायजीने भलीमोठी रक्कम लावली मात्र त्या तुलनेत त्यांनी त्या हंगामात सुमार कामगिरी केली. (IPL Auction 5 Indian Players Poor Performance after Got Highest Bidding)

1) 2014 ला युवराजसाठी आरसीबीने खिसा केला रिकामा (Yuvraj Singh RCB)

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 2014 च्या लिलावात तब्बल 14 कोटी देऊन आपल्या गोटात खेचले. आरसीबीने केकेआरबरोबरची चढाओढ जिंकली. मात्र युवराजला त्या हंगामात आरसीबीकडून 14 सामन्यात 34.18 च्या सरासरीने 376 धावांचीच खेळी करता आली. त्याने गोलंदाजीतही फारशी चमक दाखवली नाही. त्याने 22.4 षटके टाकत फक्त 5 विकेट घेतल्या. या हंगामात त्याने 83 धावांची सर्वोच्च खेळी केली. त्यानंतर आरसीबीने त्याला पुढच्या हंगामात सोडून दिले.

2) 2015 लाही युवाराज सिंग वाढूनच! (Yuvraj Singh DC)

आरसीबीने 2015 च्या लिलावात युवराज सिंगला रिलिज केले होते. त्याला गेल्या हंगामात फारशी चमक दाखवता आली नव्हती. मात्र तरीही आश्चर्यकारकरित्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 2015 ला रेकॉर्ड ब्रेक किंमतीला विकत घेतले. दिल्लीने युवराजसाठी तब्बल 16 कोटी मोजले. युवराजने आपले 2014 च्या लिलावातील रेकॉर्ड मोडले आणि तो सलग दुसऱ्या वर्षी आता सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. मात्र रेकॉर्ड ब्रेक बोली लागलेल्या युवराजला रेकॉर्डब्रेक कामगिरी मात्र करता आली नाही. त्याने 14 सामन्यात फक्त 19.07 च्या सरासरीने 248 धावा केल्या. तर हंगामात त्याने 9 षटके टाकत फक्त 1 विकेट घेतली.

3) दिनेश कार्तिकला दिल्लीने केले मालामाल (2014)

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपली आयपीएलची कारकिर्द दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनच (Delhi Capitals) सुरू केली होती. पहिले तीन हंगाम दिल्लीकडून खेळलेल्या दिनेशला 2014 ला पुन्हा एकदा दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला रिलिज केल्यानंतर दिल्लीने दिनेशवर 12.50 कोटी रूपये उधळत आपल्या संघात घेतले. मात्र दिनेशला त्या हंगामात पैसा वसूल कामगिरी करता आली नाही. त्याने 14 सामन्यात 23.21 च्या सरासरीने फक्त 325 धावा केल्या. त्याने हा हंगामात 3 अर्धशतके ठोकली मात्र एकूण धावात तो मागेच पडला.

4) जयदेव उनाडकटचा अचानक 2018 ला 'रॉयल' दिवस उजाडला (Jaydev Unadkat)

आयपीएल 2018 च्या हंगामात एक आश्चर्यकारक बोली लागली. या बोलीची सुरूवात पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांनी केली. मात्र या बोलाचा शेवट रॉयल असलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) केला. या बोलीच्या युद्धात जयदेव उनाडकट या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे उखळ 11.50 कोटी रूपयांनी पांढरे झाले. त्या हंगामातील उनाडकट हा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. उनाडकटने 2017 च्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंटकडून खेळताना चांगला मारा केला होता. त्याचा छप्पर फाड के फायदा त्याला 2018 च्या हंगामात झाला. मात्र उनाडकटला छप्पर फाड के कामगिरी काही करता आली नाही. 15 सामन्यात त्याला फक्त 11 विकेट घेणेच जमले. त्याचे रनरेटही 9.65 इतके होते.

5) केकेआरने गौतम गंभीरला गांभिर्याने घेतले (Gautam Gambhir)

कोलकाता नाईट राडर्सने (Kolkata Knight Riders) 2011 च्या हंगामात गौतम गंभीरसाठी त्याच्या बेस प्राईसच्या 12 पट मोठी बोली लावली. तो त्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. गंभीरच्या खात्यात 11.04 कोटी रूपये जमा झाले. मात्र त्याची त्या हंगामातील कामगिरी मात्र बँकेतल्या फिक्स डिपॉजीटवर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणे होती. त्याने 2011 च्या हंगामात 15 सामने खेळले. त्यात 34.36 च्या सरासरीने 378 धावा केल्या. त्याची त्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या 75 होती.

मात्र गंभीरवर केकेआरने आपला विश्वास कायम ठेवत त्याच्याकडे नेतृत्वाची कमान दिली. त्यानेही आपल्या फ्रेंचायजीचा विश्वास सार्थ ठरवत पुढच्या हंगामात का असेना त्याच्यावर केलेली गुंतवणूक सार्थ ठरवत चांगले रिटर्न दिले. त्याने 2012 आणि 2014 मध्ये केकेआरला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT