Venkatesh Iyer MI vs KKR Live Score  ESAKAL
IPL

MI vs KKR : व्यंकटेश अय्यरने एकहाती किल्ला लढवत ठोकले पहिले IPL शतक, अर्जुनचे कसे राहिले पदार्पण?

अनिरुद्ध संकपाळ

Venkatesh Iyer MI vs KKR Live Score : दुखापतीतून सावरलेल्या व्यंकटेश अय्यरने यंदाच्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. त्याने मुंबई विरूद्धच्या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी करत केकेआरला 20 षटकात 185 धावांपर्यंत मजल मारून देण्यात मोठा वाटा उचलला. त्याला रसेलने 21 धावा करत चांगली साथ दिली. मुंबईकडून ऋतिक शौकीनने चांगला मारा करत 2 विकेट्स घेतल्या. तर पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 2 षटकात 17 धावा दिल्या.

आयपीएलच्या 22 व्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. स्वाभाविकच सूर्यकुमार यादवने केकेआरला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मात्र केकेआरची सुरूवात खराब झाली. ऋतिक शौकीनने जगदीशनला शुन्यावर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाद देखील 8 धावांची भर घालून परतला.

डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरने मुंबईच्या गोलंदाजांवर काऊंटर अटॅक करत केकेआरला अर्धशतकी मजल मारून दिली होती. मात्र त्याला साथ देण्यासाठी आलेला कर्णधार नितीश राणा अवघ्या 5 धावात बाद झाला. त्याला ऋतिक शौकीनने बाद केले. यानंतर आक्रमक व्यंकटेशने अर्धशतकी मजल मारत केकेआरचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला.

मात्र दुसऱ्या बाजूने त्याला म्हणावी तशी साथ मिळत नव्हती. शार्दुल ठाकूरही 13 धावांचे योगदान देत माघारी फिरला. त्यानंतर रिंकू सिंहने 18 चेंडूत 18 धावा केल्या. दरम्यान, अय्यरने 49 चेंडूत आपले आयपीएलमधील पहिले वहिले शतक पूर्ण केले. याचबरोबर केकेआरचे दीडशतकही धावफलकावर लागले. मात्र अय्यर 18 व्या षटकात 51 चेंडूत 104 धावा करून बाद झाला.

यानंतर आंद्रे रसेलने 11 चेंडूत नाबाद 21 धावा चोपत संघाला 185 धावांपर्यंत पोहचवले. या खेळीत त्याने 1 षटकार 3 चौकार लगावले.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT