Lalit Modi Stolen Lime Light Of India Pakistan ICC Champions Trophy 2013 Entering Stadium Stand  ESAKAL
क्रीडा

India Vs Pakistan : सामन्यादरम्यान ललित मोदींनी खेळला होता 'मोठा डाव'

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यावरून दोन्ही देशातील लोकांची नजर हटत नाही मग जग का पेटेना! मात्र 2013 ला जून महिन्यात एजबेस्टन स्टेडियमवर वेगळाच प्रकार घडला. भारत - पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत (ICC Champions Trophy) एकमेकांना भिडत होते. मात्र सर्वांची नजर फक्त एका व्यक्तीवरच होती. पत्राकार देखील त्यांची मुलाखत घेण्यासाठी उतावळे झाले होते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ललित मोदी (Lalit Modi) होती. ज्यांनी बीसीसीआयला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आयपीएल दिले तेच ललित मोदी भारत पाकिस्तान सामन्यातील सर्व लाईम लाईट घेऊन गेले होते.

भारतीय संघ 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला होता. मात्र त्याआधीच झालेल्या आयपीएलमध्ये एक मोठे प्रकरण घडले होते. मॅच फिक्सिंगचे (Match Fixing) प्रकरण! राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. या वादाच्या भोवऱ्यात पुढे भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे मोठं नाव देखील अडकलं होतं.

दुसरीकडे आयपीएलचे शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते ललित मोदी इंग्लंडमध्ये निवांत आयुष्य जगत होते. बीसीसीआयने त्यांना संघटनेतून यापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यांच्यावरही मनी लाँडरिंगचे आरोप झाले होते आणि ते भारत सोडून इंग्लंडला गेले होते. बीसीसीआयकडून दुखावल्या गेलेल्या ललित मोदींनी भारत - पाकिस्तान सामना एक सुवर्ण संधी म्हणून पाहिला. कारण बीसीसीआयच्या मानगुटीवर नुकतेच मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा बसले होते. हाच डाव साधत ललित मोदी हातात तिरंगा घेऊन भारत - पाकिस्तान पाहण्यासाठी एजबेस्टन स्टेडियममध्ये आले.

ललित मोदींसारख्या हुशार व्यक्तीला संपूर्ण क्रिकेट जगताची या सामन्यावर नजर असणार याची कल्पना होती. त्यांच्यासाठी बीसीसीआय आणि ललित मोदी वादातील ललित मोदींची बाजू जगासमोर मांडण्याची आयती संधी चालून आली होती. त्यांनी या संधीचा पूरेपूर फायदा उचलला. त्यांनी स्टँडमधूनच पत्रकारांना मुलाखती दिल्या. त्यांनी आपल्या मुलाखतीत एक गोष्ट सातत्याने सांगितली की त्यांनी आयपीएल बनवले. मी आयपीएल सोडल्यानंतर बीसीसीआयला ते सांभळता आले नाही. त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप सहन करण्याची वेळ आली. ललित मोदींनी भारत पाकिस्तान सामन्याच्या आडून त्यांच्याबद्दलचे सगळा गेम पालटून टाकला. ते दावा करतात की याची सुरूवात बीसीसीआयने केली होती.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'मॅव्हरिक मिशनर : द आयपीएल मोदी सागा' (Maverick Commissioner: The IPL-Lalit Modi Saga) या पुस्तकात देखील हा किस्सा सांगितला आहे. त्या दिवशी भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान ललित मोदींची मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने सांगितले की भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात देखील त्यांना मोदींची मुलाखत घेणे का महत्वाचे वाटले.

पत्रकार म्हणाले की, 'ललित मोदींचा जो करिष्मा होता तो एक क्रिकेट एडमिनिस्ट्रेटर म्हणून फार कमी लोकांकडे आहे. ललित मोदी ज्या प्रकारे लार्जर दॅन लाईफ आयुष्ट जगत होते. भलेही त्यांना बीसीसीआयने बॅन केले असले तरी मोदी आपल्याच मर्जीने सर्वकाही करत होते. त्यांच्यावर बंदीचा काही फरक पडला नव्हता. सर्वांना माहिती आहे की आयपीएलसारखा मोठा ब्रँड त्यांनी तयार केला आहे. अशावेळी त्यांची मुलाखत कोण घेणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT