Tasmania Police shut down Post Ashes Party
Tasmania Police shut down Post Ashes Party esakal
क्रीडा

Video: पोलिसांनी पोस्ट अ‍ॅशेस पार्टी केली बंद

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेची (Ashes Series) हॉबर्ट कसोटीने सांगता झाली. या कसोटीनंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) संघासाठी पोस्ट अ‍ॅशेस पार्टी (Post Ashes Party) ठेवण्यात आली होती. या पार्टीत काही खेळाडू बीअरचा आस्वाद घेत गाणे म्हणत होते. दरम्यान, पोलीस पार्टीत दाखल झाले आणि त्यांनी पार्टी बंद पाडली. (Tasmania Police shut down Post Ashes Party)

पोलिसांना सकाळी सहाच्या दरम्यान टेरेसवर गाण्याचा मोठा आवाज होत असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर काही पोलीस कर्मचारी टेरेसवर दाखल झाले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey), ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि नॅथन लायन (Nathan Lyon) काही इंग्लंडच्या खेळाडूंबरोबर दिसत आहेत. या व्हिडिओत काही पोलीस अधिकारी देखील आहेत.

पोलिसांकडून या खेळाडूंना टेरेसवरील संगीत बंद करुन हॉटेल रुममध्ये जाण्यास सांगण्यात आले. अ‍ॅलेक्स कॅरी आणि नॅथन लायन हे दोन्ही खेळाडू मैदानावरील कपड्यातच वावरत होते. यावरून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकल्या जिंकल्या ही पार्टी सुरु झाली होती असे दिसते. पोलीस या खेळाडूंना म्हणत होते की, 'तुम्ही खूप आवाज करत आहात. तुम्हाला पॅक अप करायला सांगितले आहे. हे सांगायलाच आम्ही इथे आलो आहोत. टाईम टू बेड आभारी आहे.'

याबाबतची बातमी द एज अँड हेराल्ड वर्तमानपत्रात आली आहे. त्यात टास्मानिया पोलिसांना (Tasmania Police) क्राऊन प्लाझा होबर्ट मधून सोमवारी सकाळी समारंभाच्या हॉलमध्ये काही मद्य प्यायलेले लोक आहेत अशी तक्रार मिळाली होती. त्यानंतर या पाहुण्यांनी सकाळी 6 वाजता पोलिसांशी चर्चा केली आणि त्याना जाण्यास सांगितल्यानंतर ते गेले. अशा आशयाची ही बातमी होती. पोलिसांनी या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT