Valentine Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Valentine Day 2024 : आमचा ब्रेकअप झाला,आम्ही वेगळे झालो पण आमच्या पत्रिकेने आम्हाला एकत्र आणलं!

एकमेकांना मित्र-मैत्रिण म्हणून साथ देऊ असं त्यांनी ठरवलं, प्रेमानंतरच्या मैत्रीच हे वचन त्यांनी पाळलं.

Pooja Karande-Kadam

Valentine Day 2024 :

आजच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल लव्ह स्टोरीमध्ये आपण अक्षय आणि प्रियाला भेटणार आहोत. तुम्ही आजवर चित्रपटात पाहिलं असेल ‘रब ने मिला दि जोडी’ अशीच या दोघांचीही जोडी आहे. महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील हे जोडपं.

सांगली जिल्ह्यातली लोकं चांगली असतात असं म्हणतात. अशाच एका उच्चभ्रू घराण्यातील प्रिया कॉलेजात असताना अक्षयच्या प्रेमात पडली. पुढे त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते वेगळे झाले. पण नियतीच्या मनात होतं की हे दोघे एक झालेच पाहिजेत. त्यामुळेच कि काय हे दोघे पुन्हा एकत्र आले. पाहुयात त्यांची जगावेगळी प्रेमकथा.

प्रिया घरापासून जवळच्याच एका कॉलेजात इंजिनिअरिंग शिकत होती. तेव्हा तिची मैत्रिण निकीता हीचा मित्र होता अक्षय. अक्षय एक वेगळीच व्यथा घेऊन निकीताकडे आला होता. त्याच्या मागे एक मुलगी हात धुवून लागली होती. म्हणे माझ्याशी मैत्रीच कर, मला तू आवडतो वैगरे. तेव्हा निकीता आणि प्रिया दोघीही एकत्र होत्या. तेव्हा प्रिया आणि अक्षयची पहिली भेट झाली.

तेव्हा प्रिया आणि अक्षयने खोटे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असल्याचे नाटक केलं. तेव्हा त्या मुलीने अक्षयचा नाद सोडला. पण, अक्षय आणि प्रिया मात्र एकत्र आले. त्यांची मैत्री झाली, नंबर शेअर झाले आणि बोलणं सुरू झालं. त्या वर्षीच्या १४ फेब्रूवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला अक्षयने प्रियावरील प्रेम व्यक्त केलं. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायला आवडेल असं तो बोलला. तिनेही उशीर न करता लगेचच होकार दिला.

ग्रॅज्यूएशन पूर्ण होईपर्यंत ते दोघे प्रेमात अकंठ बुडालेले होते. एकमेकांशिवाय न राहू शकणाऱ्या प्रिया-अक्षयच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. पुढील शिक्षणासाठी प्रियाने पुण्याची अन् अक्षय कोल्हापुरची वाट धरली. त्यानंतर काही गैरसमज झाले आणि त्यांच्यात दुरावा आला. नात्यात असलेले ते दोघे एकमेकांना सोडण्याचा विचार करू लागले. प्रियाने नंबर बदलला. अन् ती पुढे निघून गेली.

पण अक्षयच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियाच्या मनात आठवणींचा हिंदोळा डोलत होता. प्रियाने अक्षयला फोन केला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि फोन पुन्हा बंद केला. त्यानंतर प्रिया पुन्हा एकदा जून्या कॉलेजवर आली. अक्षयला त्याच्या मित्राकडून हे समजलं. तो धावतच तिला भेटायला आला. पण ती लपून बसली. कदाचित ती स्वत:ला सावरू शकणार नाही म्हणून ती त्याला सामोरी गेली नाही.

अक्षयने निकिताला विचारलं, तिचा नंबर दे असे बोलला पण प्रियाने आधीच निकिताला याबद्दल सांगितलं होतं. पण निकिताने अक्षयला एक निरोप दिला तो म्हणजे प्रिया रविवारी इस्लामपूर बस स्टेशनवरून पुण्याला जाणार आहे. तेव्हा अक्षय सकाळीच बस स्टॅंडवर जाऊन थांबला. प्रिया आली बसमध्ये बसली बस सुरू झाली आणि अचानक तिच्या बाजूच्या सीटवर अक्षय येऊन बसला. तेव्हा मात्र प्रियाचा बांध सुटला.

बसच्या त्या सीटवर लोक आपल्याकडे पाहत आहेत हे भानही त्यांना राहीलं नाही. ते भांडले, रडले अन् शांत होऊन बोलले सुद्धा. कॉलेजमध्ये झालं ते झालं पण एकमेकांना मित्र-मैत्रिण म्हणून साथ देऊ असं त्यांनी ठरवलं. प्रेमानंतरच्या मैत्रीच हे वचन त्यांनी पाळलं.

पण जेव्हा प्रियाच्या लग्नाचा विषय निघाला. तेव्हा मात्र पुन्हा हा अक्षय फिरून तिच्या आयुष्यात आला. त्याचं झालं असं की, प्रियाच्या लग्नाचा योग आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी गुरूजींना पत्रिका दाखवली. तेव्हा तिच्या बाबांना गुरूजींनी सांगितलं ते धक्कादायक होतं.

तुमच्या मुलीला कॉलेजात असताना एका मुलाने लग्नाची मागणी घातली होती. आणि ती त्याला नकार देत आहे. तोच मुलगा तिच्यासाठी योग्य आहे असे गुरूजी म्हणाले. तेव्हा तिच्या बाबांनी कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या मंदिरात प्रियाला याबद्दल विचारलं. देवीच्या दारात खोट बोलणं योग्य नाही म्हणून तिनेही सगळं खरं खरं सांगून टाकलं.

तेव्हा त्या मुलाला बोलव, भेटू, त्याचा जॉब, घर, घरचे लोक कसे वाटतात बघू. योग्य वाटले तर लग्न करू अन्यथा नाही. अक्षयला तर हे ऐकून धक्काच बसला होता.

त्यानेही त्याच्या घरी सर्वकाही सांगितलं आणि अक्षय-प्रिया आणि दोघांचेही बाबा भेटले. बोलले अन् प्रियाच्या वडिलांना अक्षय आणि त्याच्या घरचे आवडले. खरं तर आपली लेक वाळवा तालुक्यातील एका मोठ्या घराण्यातील सून, आणि एक व्यावसायिक असलेल्या अक्षयची पत्नी होणार म्हटल्यावर प्रियाच्या बाबालाही भरून आलं होतं.

दोन्ही घरातील सगळे लोक घरी आले पाहण्याचा अन् बैठकीचा कार्यक्रम उरकला अन् थेट साखरपुड्याचीच तारीख धरली. तेव्हा कोरोनातील लॉकडाऊन सुरू होता. त्यातच साखरपुड्याची सुपारी फुटली अन् अक्षय प्रियाचे लग्नही झाले.

लग्नानंतरही हे दोघे एकमेकांना समजून घेतात अन् एकमेकांना चांगली साथ देतात. नशिबात भेट होणं लिहीलं असेल तर ती कोणीही थांबवू शकत नाही. देवाच्याच मनात असेल तर प्रिया अक्षयसारख्या अनेक प्रेमकथा यशस्वी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT