Improve Eye Health With These Habits sakal
लाइफस्टाइल

Eye Health Tips: तुम्ही सतत कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर असता का? मग हे उपाय वापरा आणि तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या

Healthy Tips for Eyes: रोजच्या तणावपूर्वक आयुष्यातून डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही पुढे काही टीप्स दिल्या आहेत.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. डिजिटल उपकरणांचा अतिरेक डोळ्यांवर ताण आणतो, ज्यामुळे दृष्टीसंबंधी त्रास होतो.

  2. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्यायाम, पोषक आहार, आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.

  3. स्क्रीन टाइम कमी ठेवणे, संरक्षणात्मक उपाय वापरणे आणि नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

Health Tips For Eyes: आजच्या डिजिटल युगात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपला बराचसा वेळ स्क्रीनसमोर घालवतो. लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर डिजिटल उपकरणांचा अतिवापर केल्याने डोळ्यांना ताण येतो. परिणामी, डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा, आणि खाज निर्माण होते. सततच्या स्क्रीन टाइममुळे दृष्टी दुर्बळ होण्याचा धोका वाढतो. यासाठी, डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खालील दिलेल्या टिप्सचा नक्की वापर करा.

अशी घ्या डोळ्यांची काळजी

२०-२०-२० नियम पाळा

आजकाल आगदी छोट्या छोट्या कामांसाठी आपण डिजिटल उपकरणे वापरतो. डिजिटल उपकरणांसमोर काम करताना डोळ्यांवर ताण येतो. यासाठी दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद बघा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि डोळ्यांचा ताण कमी होतो.

डोळ्यांचे व्यायाम करा

डोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी सोपे व्यायाम करा. डोळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व उलट फिरवा. याशिवाय, जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा, नंतर दूरच्या वस्तूकडे पाहा. हे व्यायाम डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी देतात.

डोळ्यांसाठी पोषक आहार घ्या

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात गाजर, पालक, गोड बटाटे यांसारखे व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थ समाविष्ट करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिड्ससाठी मासे, अक्रोड, व जवस खा. हिरव्या पालेभाज्यांमधील लुटिन आणि झेक्झँथिन दृष्टीसाठी फायदेशीर ठरतात.

हायड्रेटेड राहा

डोळ्यांतील कोरडेपणा दूर करण्यासाठी पुरेसे पाणी प्या. तसेच डोळे ओलसर राहणे आवश्यक असते, त्यासाठी डोळ्यांची नियमित उघड-झाप करा.

स्क्रीन टाइम कमी करा

स्क्रीनसमोर घालवलेला वेळ कमी करा किंवा ब्लू लाइट ब्लॉकींग चष्म्याचा वापर करा. स्क्रीन योग्य उंचीवर ठेवा आणि डोळ्यांपासून २०-२५ इंच अंतरावर ठेवा.

डोळे संरक्षित ठेवा

कडक उन्हात बाहेर पडताना तसेच यूव्ही किरणांपासून डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा. धोका असलेल्या कामांमध्ये संरक्षणात्मक चष्म्याचा वापर न चूकता करा.

डोळ्यांची नियमित तपासणी करा

दरवर्षी डोळ्यांची तपासणी करा. डोळ्यांच्या आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर लगेच उपचार मिळवा.

डोळ्यांसाठी आरामदायक तंत्रे वापरा

पामिंग पद्धती वापरून डोळ्यांना आराम द्या. त्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर हात चोळून गरम करा आणि मग डोळे बंद करून हात हलक्या दाबाने डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते.

पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप मिळाल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते आणि थकवा दूर होतो, यामुळे दृष्टी सुधारते. त्यामुळे गरजेची असलेली ७-८ तासांची पूर्ण झोप घ्या.

टीप: डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतील. मात्र, काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डिजिटल युगातही डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.

FAQs

  1. डोळ्यांवर स्क्रीनचा ताण कसा कमी करू शकतो?
    (How can I reduce eye strain from screens?)
    ➤ दर २० मिनिटांनी २० फूट दूर वस्तूकडे २० सेकंद पाहा (20-20-20 नियम) आणि स्क्रीन टाइम कमी ठेवा.

  2. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते अन्न खावे?
    (What foods are good for improving eye health?)
    ➤ गाजर, पालक, मासे, अक्रोड, आणि लुटिन-झेक्झँथिनयुक्त पालेभाज्या उपयुक्त ठरतात.

  3. ब्लू लाइटपासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?
    (How can I protect my eyes from blue light?)
    ➤ ब्लू लाइट ब्लॉकींग चष्मा वापरा आणि स्क्रीनचे योग्य अंतर व उंची राखा.

  4. डोळ्यांची नियमित तपासणी किती वेळाने करावी?
    (How often should I get my eyes checked?)
    ➤ दरवर्षी एकदा डोळ्यांची तपासणी करणे शिफारसीय आहे, विशेषतः त्रास जाणवत असल्यास.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT