Balumama Temple
Balumama Temple  esakal
लाइफस्टाइल

Balumama Temple : बाळूमामांनी स्वत: उभारलेला भुतं उतरवण्याचा खांब, काय आहे त्यामागची मान्यता ?

सकाळ डिजिटल टीम

Balumama Temple :

अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यांमध्ये आमदापूरच्या संत बाळूमामांचे भक्त आहेत. तर, गेल्या वर्षीपासून टिव्हीवर बाळूमामांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरली आहे. संत बाळूमामा हे अवतारी पुरूष होते.

संत बाळूमामा हे एकोणिसाव्या शतकातील एक मराठी संत होते. त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यव्वा आरभावे या जोडप्याच्या पोटी आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ (दि. ३ ऑक्टोबर १८९२) रोजी झाला. तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे त्यांचे जन्म गाव आहे.

लहानपणापासूनच बाळुमामा ते सामान्य नसल्याचे अनुभव देत होते. कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही याची वेळोवेळी प्रचिती येत होती. कधी काट्यावर झोपणे तर कधी एकटेच बडबडत बसणे याचा अनुभव लोक घेत होते. लहानपणी ते एका मारवाडी कुटुंबात चाकरीला जात होते. तिथे त्यांनी फुटलेल्या पितळेच्या ताटात भगवान महाविरांचे दर्शन घडविले, वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केले.

अशा या अवतारी बाळुमामांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक हालही सोसले. रानोमाळी मेंढरं घेऊन ते फिरायचे तेव्हा ‘आमच्या रानात तुझी मेंढरं बसवायची नाहीत’ अशी वागणूकही लोकांनी मामांना दिली. पण मामा त्या व्यक्तीलाही आपलंस करून त्यांच्या कार्याची, चमत्कारांची ओळख पटवून देत असतं.

मामांनी मेतके गावात एक खांब उभारला आहे. त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. भूतबाधा उतरवणारा तो खांब आहे, असे भाविक सांगतात. त्यामागील कथा, खांबाची महती काय आहे हे पाहुयात.

1932 मध्ये बाळुमामांनी भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता. आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आलं आहे. जर तुम्हाला या मंदिराती लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तरडटजच श्रावण महिन्यात पूर्णवेळ हा खांब उघडा असतो. म्हणजे त्यावरील आवरण काढले जाते. संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो.

१९३२ मध्ये खांब का रोवला गेला

मेतके गावातील भक्तांनी बाळुमांमाची किर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते. भंडाऱ्याची उधळण, पालकी, ढोल, मेंढ्यांची सेवा अन् भक्तांच्या पंगती यामुळे मामा भारावून गेले. यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण रहावी या हेतून खांब उभा करायचे ठरले.

एका भक्ताने सागवानाचे झाडच काढून मेतके इथं आणले. मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं. ‘असत्य, वाईट गोष्टींना पाचर मारतो’ म्हणजेच, आळा घालतो, अशा वाणीने बाळुमामानी हा खांब स्थापित केला. असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वीतलावावर मेतक्यात एक अशीही प्रचिती या खांबाला आहे.

या मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचेही महत्त्व वाढत होते. आजही तिथले नागरिक सांगतात की, या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने लागिरलेले लोक, भूत लागलेले सगळे निघून जाते, अशी मान्यता आहे.

नाव न घेण्याच्या अटीवर, कोल्हापुरच्या एका भक्ताने सांगितले की, मी २००६ मध्ये माझ्या पत्नीला घेऊन या मंदिरात आलो होतो. तिची प्रकृती ठिक नव्हती. ती घरी थांबायची नाही सतत आत्महत्येचे प्रयत्न करायची. तेव्हा देवाच्या मावशींनी मला सांगितले की, तिला लागिरले आहे. तेव्हा मला मामांच्या या मंदिराबद्दल समजले.

मी पत्नी आणि मुलांसह ८ दिवस या मंदिरात थांबलो. एके रात्री डोळा लागला तर पत्नी मंदिरात नव्हती. ती वाट दिसेल तिकडे पळत सुटली होती. मी शोधले अन् मामांकडे तिच्यासाठी प्रार्थना केली. मामांनी माझी प्रार्थना ऐकली. या पवित्र मंदिर आवारात राहून तिच्यात काही सकारात्मक बदल झाले.

आजकालच्या लोकांना हे पटणार नाही. पण मंदिरात असलेल्या त्या खांबाभोवती फेऱ्या मारणं, बाळूमामांच अस्तित्व जिथे होतं त्या परिसरात मुक्काम करणं यानेच माझ्या पत्नीसाठी औषधाप्रमाणे काम केल.

बाळुमामांच्या मंदिरात आजवर अनेक भाविक व्याधीमुक्त होऊन गेले आहेत. बाळुमामांचे मुख्य मंदिर जरी आदरापुरात असले तरी मूळ मंदिर म्हणून मेतके गावालाच स्थान आहे. याही मंदिरात मामांसह सदगुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रूक्मिणीची सुरेख मूर्ती आहे.

बाळूमामांच्या मेढ्यांनाही देवासमान पुजले जाते. मामांच्या मेंढ्यांचे तळ अनेक गावात पहायला मिळतात. जिथे मेंढ्या असतात तिथल्या गावचे लोक त्यांची सेवा करतात. मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात तळावरील मामांच्या रथाच्या दर्शनाला जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT