Relationship Tips for Single People esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: मित्राची गर्लफ्रेंड बघून जळू नका; सिंगल रहायचे नसेल तर या सवयी बदला!

आपल्यालाही पार्टनर असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना इच्छा असूनही जोडीदार मिळत नाही...

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips for Single People: जगात कोणतीही व्यक्ती एकटी राहू शकत नाही, एकटा आलोय एकटा जाईल असं कितीही म्हटलं, तरी प्रत्येकाला आयुष्यात कोणीतरी आपलं असं व्यक्ती असावं असं प्रत्येकाला वाटतं..

अनेकदा आपण अशा काही व्यक्ती आपल्या आजूबाजूला बघतो सुद्धा ज्या आपल्या लाईफ पार्टनर व्हाव्यात असं आपल्याला मनापासून वाटत असतं, पण ते घडत नाही.. कोणतीही व्यक्ती फार काळ एकटी राहू शकत नाही. आपल्यालाही पार्टनर असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना इच्छा असूनही जोडीदार मिळत नाही.

त्यामुळे लोकं सिंगल असतात. सिंगल असण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषाचं प्रमाण जास्त आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अनेकदा मुलं आपल्या भावनांबद्दल उघडेपणाने पटकन बोलू शकत नाही..

जाणून घेऊया ही कारणे...

१. कमी आत्मविश्वास: मुलींना कॉन्फिडन्स असलेली मुलं जास्त आवडतात, ज्यांना स्वतःवर आपल्या आवडी निवडी वर कॉन्फिडन्स नसतो अशी मुलं मुलींना आवडत नाहीत. जर मुलगा कॉन्फिडंट नसेल तर उद्या तो आयुष्यातले मोठे निर्णयही घेऊ शकणार नाही अशी भीती त्यांना वाटत असते.

यासाठी आधी आपले विचार, राहणीमान यावर नियंत्रण मिळवा.. विचारपूर्वक निर्णय घ्या म्हणजे तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल.

२. इंट्रोव्हर्टनेस: अनेकदा मुलं अबोल आणि इंट्रोव्हर्ट असतात. अशा मुलांच्या जवळ जाणं मुलींना कठीण असतं, कारण ही लोकं खूप कमी लोकांशी बोलतात, पटकन कोणालाही आपल्या जवळ येऊ देत नाही.

त्यामुळे मुलं अनेकदा दिसायला खूप सुंदर आणि स्वभावानेही चांगले असले तरी त्यांच्या स्वभावामुळे ते इतरांना गोंधळून टाकतात..

३. स्वतःच्या दिसण्याकडे दुर्लक्ष करणे: कसही गबाळ्यासारखं रहाणं, स्वतःच्या आरोग्याची, दिसण्याची काळजी न घेणं असा अनेक पुरुषांचा स्वभाव असतो.

असे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही, उलट आपल्या स्वतःची काळजी घेणारे फिट राहणारे पुरुष स्त्रियांना खूप आवडतात त्यामुळे स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

४. फ्लर्टिंग करता येत नाही: अनेकदा आपल्या घोळक्यात तुम्ही ऐकलं असेल की मुलांना छान फ्लर्टिंग करता येत नाही. अनेकदा पुरुष स्त्रियांना डेट करतात पण एकमेकांशी छान आणि सहजपणे गप्पा मारू न शकल्यामुळे स्त्रियांना आवडत नाहीत.

काही पुरुषांमध्ये नैसर्गिकरित्या फ्लर्टिंग स्कील्स असतात. पण, काही पुरुष एखादी पिकअप लाइन शोधणं सुद्धा कठीण असतं.

५. सिलेक्टिव्ह आवडनिवड असणं: लोकं म्हणतात खरं की मुली खूप सिलेक्टिव्ह आवडनिवड जपतात पण याच प्रमाण मुलांमध्येही दिसून येतं. यामुळे ते रिलेशनशीमध्ये राहू शकत नाहीत.

त्यांना आपल्या जोडीदाराकडून फारच अपेक्षा असतात आणि याबाबत ते उगाच खूप हौशी असतात जे मुलींना आवडत नाही.

जर तुम्ही आपल्या स्वभावातल्या या गोष्टी बदलल्या तर तुम्हालाही नक्कीच एक योग्य आणि सुंदर गर्लफ्रेंड मिळेल यात काहीही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT