Where is it cheaper to shop DMart store or DMart Ready app December 2025

 

esakal

लाइफस्टाइल

DMart Sale : डिमार्ट स्टोअर की DMart रेडी ऑनलाइन अ‍ॅप..कुठून खरेदी करणे जास्त स्वस्त? डिस्काउंट अन् अधिक फायदा हवाय..मग हे एकदा बघाच

Dmart Ready VS DMart Store Offers Comparison : डीमार्ट स्टोअर की डीमार्ट रेडी अ‍ॅप? कुठून खरेदी कराल तर जास्त फायदा होईल, या लेखात सविस्तर महिती नक्की वाचा

Saisimran Ghashi

DMart Offers : मुंबई, पुणे, नाशिक किंवा महाराष्ट्र-गुजरातमधल्या कोणत्याही शहरात राहणाऱ्यांसाठी डीमार्ट म्हणजे स्वस्त दरात उत्तम दर्जाची खरेदी करणाऱ्यांचे आवडते ठिकान. पण आता डीमार्टने आपली DMart Ready ऑनलाइन सेवा जोरात चालू केली आहे. किराणा, घरगुती वस्तू, भाज्या-फळे ते कपडे-इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सगळंच घरी बसल्या मिळतंय. प्रश्न हाच की ऑफलाइन स्टोअर की DMart Ready अॅप/वेबसाइट? कुठून खरेदी करणे खिशाला जास्त परवडणारे आहे? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर

किंमत तुलना (डिसेंबर २०२५ च्या ताज्या ऑफर्सनुसार)

  • Fortune सोया तेल १ लिटर – स्टोअरमध्ये १५९ रुपये, अॅपवर १३९ रुपये + ५% अतिरिक्त डिस्काउंट

  • Aashirvaad आटा १० किलो – दोन्ही ठिकाणी ३८९ रुपये, पण अॅपवर ५०० रुपयेच्या+ खरेदीवर ५० रुपयेचा कॅशबॅक

  • दूध (Amul Gold १ लिटर) – स्टोअर ८२ रुपये, अॅपवर ७८ रुपये (सबस्क्रिप्शन डिस्काउंटसह)

  • भाज्या-फळे – अॅपवर सकाळी ७ ते १० दरम्यान ऑर्डर केल्यास १०-१५% जास्त स्वस्त

डीमार्ट स्टोअरचे फायदे

  • समोरासमोर माल तपासता येतो, एक्स्पायरी डेट पाहता येते

  • मोठ्या प्रमाणात खरेदी करून ताबडतोब घरी न्यायची सोय

  • बिल २००० रुपयेपेक्षा जास्त झाल्यास मोफत होम डिलिव्हरी (काही शहरांत)

  • जुन्या ग्राहकांसाठी स्टोअरमध्येच “Buy More Save More” स्क्रॅच कार्ड्स

डीमार्ट रेडी अॅपचे फायदे

  • दररोज सकाळी १० वाजता “Flash Sale” – ३०-५०% ऑफ (मर्यादित स्टॉक)

  • पहिली ऑर्डर ४९९ रुपये+ याहून अधिकच्या खरेदीवर १५० ऑफ रुपये + १ महिना फ्री डिलिव्हरी मिळते

  • “Pick-up Point” पर्याय – जवळच्या डीमार्टमधून स्वतः घरी आणल्यास अतिरिक्त ३-५% सूट मिळते

  • सबस्क्रिप्शन प्लॅन – दरमहा ९९ रुपये देऊन रोजच्या दुध-भाजीवर १०-२०% हमखास बचत करता येते

छोट्या-मोठ्या खरेदीसाठी DMart Ready अॅप थोडेसे स्वस्त पडते, विशेषतः ज्यांना दररोज डिलिव्हरी हवी किंवा फ्लॅश सेलचा फायदा घ्यायचाय त्यांच्यासाठी. पण मोठी महिन्याची खरेदी, तपासून-पाहून घ्यायची असेल तर ऑफलाइन स्टोअरच बेस्ट. किंमतीत फरक फक्त ३-८% असतो, पण दोन्ही ठिकाणी डीमार्टची Lowest Price Guarantee लागू आहे. म्हणजे तुम्ही कुठूनही खरेदी करा, जास्त पैसे देण्याची वेळ येतच नाही. सगळे काही स्वत मिळते

शेवटी दोन्ही पर्याय उत्तम आहेत. गरजेनुसार स्टोअर किंवा अॅप निवडा… आणि डीमार्टची बचत कायमच तुम्हाला करता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT