madhuri dixit sakal
लाइफस्टाइल

Women's Fashion : पन्नाशीनंतरही माधूरीसारखं दिसायचंय स्टायलिश? 'या' पाच टिप्स फॉलो करा

पन्नाशीनंतर फैशनेबल ट्रेंडला फॉलो करणे हे एक आव्हान असतं. पण काही टिप्स फॉलो करुन तुम्ही कोणत्याही वयात खूप स्टायलिश दिसू शकता.

सकाळ डिजिटल टीम

फॅशनचं ट्रेंड दरदिवशी बदलत असते. अशात ट्रेंडीग फॅशनमध्ये स्वत:ला अपडेट ठेवणे खूप गरजेचं असतं. प्रत्येकाला सुंदर आणि वेगळं दिसण्याची इच्छा असते. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन टिप्स फॉलो करतात. मात्र वाढत्या वयासोबत फॅशन करणे आणखी कठीण होतं.

पन्नाशीनंतर फैशनेबल ट्रेंडला फॉलो करणे हे एक आव्हान असतं. पण काही टिप्स फॉलो करुन तुम्ही कोणत्याही वयात खूप स्टायलिश दिसू शकता. चला तर जाणून घेऊया या टिप्स. (do you want to look stylish over aged 50 like Madhuri Dixit try these Fashion tips)

madhuri dixit

रेड लिपस्टिकचा वापर करा
बोल्ड लुक आपल्या फॅशनला हॉलीवुड इफेक्ट देतो. जर तुम्ही तुमच्या फॅशन मध्ये रेड लिपस्टिकचा समावेश कराल तर तुमचा लुक अधिक आकर्षित दिसू शकतो. रेड लिपस्टिक तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते आणि तुमच्या दातांना अधिक पांढरे दिसण्यास मदत करते.

स्टायलिश आणि मोठ्या नेकलेसचा वापर करणे
तुम्ही अनेकदा पार्टींमध्ये सेलिब्रिटींना मोठमोठे नेकलेस घातलेले बघितले असेल कारण असे नेकलेस तुमच्या लुकला अधिक आकर्षित बनवतात. स्टायलिश नेकलेस सहसा लोकांच्या नजरेत येतात. त्यामुळे स्टायलिश नेकलेस आवडीने घाला.

madhuri dixit

पांढऱ्या रंगाचा पॅंट घाला
ब्लॅक पँट खूप जूना फॅशन ट्रेंड आहे. जर तुम्हाला हजारो लोकांमध्ये उठून दिसायचंय तर काळ्या पँट ऐवजी पांढरा पँट घाला. तुम्ही पांढरा रंगाचा जीन्स किंवा बेल बॉटम पँटपण घालू शकता.

सफेद शर्ट किंवा ब्लाउज घाला
स्टाइलिश सेट मध्ये पांढरा रंगाचा सेट असणं गरजेचं आहे. पांढरं शर्ट किंवा ब्लाउज तुम्हाला अभिनेत्रीसारखा लूक देतो. पांढरा रंग तुम्हाला अॅक्टीव्ह दाखवतो.

स्टाइलिश बूट-सँडल घाला
फुटवियर एक अशी गोष्ट आहे जी सहज कोणाच्याही नजरेत सहज येते. जर तुम्हाला मॉर्डन फॅशन ट्रेंडनुसार चालायचं असेल तर याकडे विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. तुम्ही मॅचिंग शुज किंवा सँडल परिधान करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : अपहरण करून खून केल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT