Dreams Meaning esakal
लाइफस्टाइल

Dreams Meaning : तूम्हाला लग्नाचं स्वप्न पडणं शुभ असतं की अशुभ?

तूमचही स्वप्नात लग्न झालंय का? पहा काय अर्थ आह त्याचा

सकाळ डिजिटल टीम

स्वप्नात एखादी व्यक्ती दिसणं शुभ मानलं जातं. स्वप्नात एखादा प्राणी पशू हल्ला करतोय असं दिसलं तर आपण ते आपल्यासाठी धोकादायक मानले जाते. स्वप्न पडणं आपल्या हातात नसले तरी होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे संकेत ते आपल्या पर्यंत पोहोचवत असतात. तूम्हालाही स्वप्न पडतात ना? मग पुढे वाचाच.

हिंदू धर्मात विवाह हा पवित्र विधी मानला जातो. कारण आपल्या धर्मानेच समाजाची घडी बसवण्यासाठी काही गोष्टी आखून दिल्या आहेत. त्या रिती आणि परंपरांमध्येच लग्न हा एक महत्त्वाचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आता या लग्नाचे स्वप्न जर तूम्हाला पडले तर त्याने काय होतं. त्याचा अर्थ काय होतो, याबद्दल आज जाणून घेऊयात.(lifestyle)

सध्या खरमास आहे. यासाठी लग्नासह सर्व शुभ कार्य करू नयेत असे सांगितले जाते. ज्योतिषाचार्यांच्या मते सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करताना खरमास असतो. सूर्य एका राशीत ३० दिवस राहतो. या काळात मांगलिक कामे केली जात नाहीत, परंतु नातेसंबंधांवर चर्चा होऊ शकते. अविवाहित मुले-मुली लवकर लग्न व्हाव यासाठी पूजा आणि उपवास करतात.

यासाठी त्यांच्या मनात नेहमी लवकर लग्नाचा विचार येत असतो. रात्री झोपेतही त्याला लग्नाची स्वप्ने पडतात. स्वप्नांचा वास्तविक जीवनाशी खोलवर संबंध असतो.

- तुम्हीही झोपेतच लग्न करताना पाहिलं असेल तर त्याचा अर्थ ते शुभ नाही. म्हणजे भविष्यात तुमच्यावर काही संकट येणार आहे.

- जर तुमचा स्वप्नांच्या शास्त्रावर विश्वास असेल तर स्वप्नात स्वतःचे दुसरे लग्न पाहणे शुभ नाही. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येणार आहेत. तुमच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते.

लग्न सोहळा

- स्वप्नात मित्राचे लग्न पाहणे देखील योग्य नाही. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आगामी काळात तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल.

- स्वप्नात तुमची स्वतःची लग्नाची मिरवणूक दिसली तर ते स्वप्न शास्त्रात शुभ मानले जाते. याचा अर्थ लवकरच तुमचे भविष्य उज्वल होणार आहे. तुमच्या सन्मानात वाढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT