Fashion tips esakal
लाइफस्टाइल

Fashion tips : मोनोक्रोम फॅशन आता भारतात; या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील ट्राय केली ही स्टाईल

सोशल मीडियावर न्यू ड्रेस लूक बघून इंप्रेस

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेकदा सोशल मीडियावर न्यू ड्रेस लूक बघून इंप्रेस होत असतो, सध्या अशीच एक नवीन ट्रेंड सगळीकडे आवडली जाते आहे. सध्या अनेक सेलिब्रेटींकडून एक फॅशन पुढे येताना दिसते आहे आणि ती म्हणजे मोनोक्रोम.

पण मुळात मोनोक्रोम ड्रेसेस म्हणजे नक्की काय?

साधारण पूर्ण शरीरावर एकाच रंगाचे आऊटफिट घालणे किंवा काळया, पांढऱ्या, राखाडी रंगाचे आऊटफिट घातले तर या फॅशन पद्धतीला मोनोक्रोम आऊटफिट पद्धत म्हणता येईल. आपले कपाट फक्त रंगबेरंगी कपड्यांनीच नाही तर काही अशा ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसेसनेही भरता येते. मुळात खूप स्टंनिंग लूक हे ड्रेसेस तुम्हाला देतात. जुन्या काळात असे फ्रॉक बॉलिवूड अभिनेत्री घालतांना दिसल्या आहेत.

पण आता परत ही फॅशन आली आहे याची सुरुवात झाली ती जान्हवी कपूरच्या ड्रेस पासून आणि मग पुढे सारा आली खान, दीपिका पादुकोण, करिश्मा कपूर, प्रियांका चोप्रा अशा अनेक सेलेब्स अभिनेत्रींनी या फॅशनचे कपडे अगदी डेली युज पासून तर एखाद्या छान पार्टी पर्यंत घातल्याच दिसत आहे.

मुळात मोनोक्रोम फॅशन ही वर्षभर घालण्यायोग्य आहे. जिथे काळ्या आणि पांढऱ्या सारख्या रंगछटा एकत्र येतात, तो एक टू-फ्लेक्स प्रकार बनतोदीपिका पदुकोण, जान्हवी कपूर, करिश्मा कपूर, सारा अली खान, प्रियांका चोप्रा आणि इतर अनेक सेलिब्रिटी मोनोक्रोम स्टोरीटेलर आहेत. याची सुरुवात मिली प्रमोशनसाठी जान्हवीच्या लूकने झाली.

मोनोक्रोम कपड्यांमध्ये तुमचे आवडते स्टार

1. सारा अली खान

हीचा ड्रेस प्रीटी लिटल थिंग स्ट्रॅपलेस मिनी ड्रेसमध्ये व्ही नेकलाइन आणि रफल्ड हेम असा डिझाइन केला आहे एका पार्टी लूक साठी परफेक्ट दिसतो आहे. ब्लॅक हिल्स सोबत ते खूप सुंदर दिसते आहे.

2. दीपिका पदुकोण

दिपीकाने अॅनिमल प्रिंट, स्वीटहार्ट नेकलाइन, फुल स्लीव्हज आणि शोल्डर पॅड अशी डिझाइन केलेला ड्रेस घातला आहे. थोडं सोनं हे नेहमीच आपला लूक अजून ग्रँड करत म्हणूनच यावरती गोल्डन कानातले तितकेच सुंदर आणि छान दिसतात.

3. जान्हवी कपूर

25 वर्षीय स्टार जान्हवी कपूर या फ्रिस्की मिडी ड्रेसमध्ये बॉम्बशेलसारखी दिसत होती. ड्रेसमध्ये व्हाईट पाइपिंग, साइड कट-आउट्स आणि पुढच्या बाजूला एक मिनी ड्रेस होता. तिने ब्लॅक एंकल-स्ट्रॅप स्टिलेटोसह स्लीव्हलेस ड्रेस घातला होता.

4. करिश्मा कपूर

करिश्मा कपूर आपल्या स्ट्यायलिंग खूप चर्चेत असते, तिने मोनोक्रॉम फॅशन स्वीकारत हे परत एकदा पटवून दिलं आहे. एंकल-स्ट्रॅप स्टिलेटोससोबत स्टाईल केले होते.

5. प्रियांका चोप्रा

फॅशनवर मजबूत पकड ठेवणारी कोणी असेल तर ती प्रियांका चोप्रा अस म्हणायला काहीच हरकत नाही. तिने एकदा न्यूयॉर्कमध्ये हा लूक ट्राय केला होता. एका खांद्याच्या ड्रेसमध्ये पांढरे आणि काळे फ्रील होते. तिच्या अॅक्सेसरीजमध्ये ड्रॉप इअररिंग्सचा समावेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT