Hair Care  esakal
लाइफस्टाइल

Hair Care : केसांच्या अनेक समस्यांची सुट्टी करेल ‘अळशी’, कसे वापरायचे ते पहा!

फ्लेक्ससीड तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते

Pooja Karande-Kadam

Hair care : रोजच्या चुकीच्या आहारामुळे चुकीच्या लाइफस्टाइलमुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. शरीराच्या प्रत्येक भागावर होतो तशाच केसांच्या समस्यांमध्ये वाढ होते. यात केस तुटणे, गळणे आणि कोरडे होण्याचा त्रास होत असेल तर आयुर्वेदातील एक पदार्थ तुम्हाला मदत करणार आहे.

तुम्ही फ्लेक्ससीड किंवा आळशीच्या बियांबद्दल ऐकले असेल. तर या बिया तुमच्या केसांसाठी बेस्ट आहे. यात असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे केस गळणे टाळतात आणि कोरडेपणा दूर करून चमक देण्यास मदत करतात.

हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जसे त्वचा कोरडी पडते तसेच आपले केसही कोरडे होतात. फ्लेक्ससीड केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. फ्लेक्ससीड हिवाळ्यात केसांना चमक आणि मुलायमपणा प्रदान करते.

फ्लेक्ससीड तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. आणि आपण घरी सहजपणे फ्लेक्स सीडचा हेअर मास्क बनवू शकता. ज्याचा नियमित वापर केला. तर तुमचे केस मुलायम होतील.

फ्लेक्ससीड आणि केळीचा मास्क

केळी हेअर मास्कचे अनेक फायदे आहेत. हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला केळी, फ्लेक्ससीड जेल,  हनी स्पून आणि बदामाचे तेल लागेल. सर्व प्रथम एका भांड्यात १ केळी चांगले मॅश करून घ्या. आता त्यात मध, बदामाचे तेल आणि ४ चमचे फ्लॅक्ससीड जेल टाका. सर्वकाही मिसळून पेस्ट तयार करा. केसांना मुळांपासून लांबीपर्यंत पूर्णपणे लावा आणि 30 मिनिटे तसेच ठेवा.

फ्लेक्ससीड आणि दही हेअर मास्क

जर तुमचे केस खूप गळत असतील तर हा घरगुती हेअर मास्क नक्कीच वापरून पहा, केस गळणे पूर्णपणे थांबेल. हे हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला फ्लॅक्ससीड जेल, दही आणि कोरफड व्हेरा लागेल.

सर्व प्रथम एका भांड्यात अर्धा वाटी घट्ट दही घ्या, आता त्यात 3 चमचे कोरफडीचे जेल आणि 3 चमचे फ्लॅक्ससीड जेल घाला. ही पेस्ट केसांना लावा आणि २० मिनिटे राहू द्या. यानंतर सौम्य शैम्पूने धुवा.

अळशीच्या बिया अशा असतात

फ्लेक्ससीड कोरफड हेअर मास्क

हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल, राइस स्टार्च आणि फ्लेक्ससीड जेल घ्यावे लागेल. यानंतर 1 वाटी ताजे एलोवेरा जेल घ्या. आता त्यात अर्धी वाटी भिजवून बारीक पेस्ट केलेले तांदळाचे पीठ घाला.

आता त्यात 4 चमचे फ्लॅक्ससीड जेल टाका, मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांना लावा आणि ३० मिनिटांनी केस धुवा.

ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस आणि फ्लेक्ससीड पावडर हेअर मास्क

हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला फ्लेक्ससीड पावडर, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस लागेल. सर्व प्रथम, एका भांड्यात दोन चमचे फ्लेक्ससीड पावडर, ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा.

आता हे मिश्रण चांगले फेटून घ्या. ते तुमच्या केसां मूळांपासून शेवटपर्यंत लावा. आता ते तसेच ठेवा आणि ३० मिनिटांनी केस धुवा.

महत्त्वाची टिप

केस कोरडे होणे, फाटे फुटणे यामुळे केसांना पोषण मिळत नाही. तुम्ही आळशीच्या बियांचा वापर सतत केसांसाठी केलात तर त्यांना योग्य प्रमाणाच पोषण मिळतं. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या मुलायम आणि चमकदार होतात. (Hair care tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT