jaggery benefits esakal
लाइफस्टाइल

Jaggery Benefits : साखरेमुळे हृदयविकाराचा धोका वाढलाय ? गूळ आहे आरोग्यदायी पर्याय..वाचा फायदे

शरीरात साखर जास्त झाल्यावर फक्त मधुमेह होतो असे नाही, तर रक्तदाब, हृदयरोग आणि वजन वाढण्याची समस्या ही निर्माण होते.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाले की ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. साखरेचे प्रमाण अधिक झाल्यावर हृदयविकाराचा धोका ही संभवतो. त्यामुळे, साखर कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

जर तुम्हाला गोड पदार्ख खाण्याची सवय असेल तर त्याला पर्याय म्हणून आजकाल अनेक जण गुळाचा वापर करताना दिसतात. गुळ हा पदार्थ आपल्या शरिरासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

गुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषणतत्वे असतात. त्यामुळे अनेक जण जेवण झाल्यानंतर गुळाचे सेवन करण्याचा सल्ला अवश्य देतात. चला तर मग जाणून घेऊयात गूळ खाण्याचे फायदे..

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

जर तुम्हाला तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर तुम्ही जेवण झाल्यावर गुळ अवश्य खा.

रक्तदाब नियंत्रित राहतो

आजकाल अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावते. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या जाणवत असेल तर तुम्ही गुळ खाल्लाच पाहिजे. गुळाच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

साखर खाण्याऐवजी अनेक जण गुळ खातात. वजन कमी करण्यासाठी गुळ खाणे हे अतिशय लाभदायी ठरते. त्यामुळे, जेवण झाल्यानंतर गुळ नक्की खा, यामुळे तुमची पचनक्रिया देखील सुरळीत होते. गुळ खाणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

हाडे मजबूत राहतात

गुळ खाल्ल्याने आपल्या शरिरातील हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हाडांच्या बळकटीसाठी गुळ खाणे अतिशय फायद्याचे आहे. गुळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस अशा पोषकतत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्या शरिरातील हाडे मजबूत राहतात.

अशक्तपणा कमी होतो

जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल किंवा खूप थकल्यासारखे वाटत असेल तर नियमितपणे गुळ खाण्यास सुरूवात करा. गुळामध्ये भरपूर पोषकतत्वे असतात, ज्यामुळे शरिराला भरपूर ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

गुळ खाल्ल्यामुळे त्वचेला देखील भरपूर फायदे मिळतात हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. मात्र, हे खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी गुळ खाणे हे फायदेशीर आहे. गुळ खाल्ल्याने रक्तातील हानिकारक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि त्वचा स्वच्छ होते. गुळामुळे रक्त परिसंचरण सुरळीत होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT