Honey Water Benefits  esakal
लाइफस्टाइल

Honey Water Benefits : अनेक आजारांवर उपाय म्हणून ही एक सवय लावून घ्याच, बघा तुम्ही आठवड्यात ठणठणीत व्हाल

मध पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते

Pooja Karande-Kadam

Honey Water Benefits : तुम्हाला सतत दवाखाना मागे लावून घ्यायचा नसेल तर काही चांगल्या सवयी तुम्ही लावून घेतल्या पाहिजेत. असं डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ नेहमी सांगत असतात. व्यायाम, आहाराचे नियोजन आणि दिवसाची सुरूवात एक हेल्दी ड्रिंकने करावी असेही सांगितले जाते.

काही लोक चार दिवस, आठवडाभर या गोष्टी पाळतात आणि मग विसरून जातात. पण, सकाळची सुरूवात चहा कॉफीने नाहीतर कोमट पाणी पिऊन करावी असे तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. फक्त कोमट पाणी नाहीतर त्यात घातलेला एक चमचा मध तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त करू शकतो.

कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्यास अनेक फायदे मिळू शकतात. होय, मध आणि कोमट पाणी प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. मधामध्ये अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

वजन कमी होते

ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी मध एखाद्या औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमची सकाळ मध आणि पाण्याने सुरू करू शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्या. हे पेय प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल आणि जास्त खाणे टाळावे, जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

शरीर हायड्रेट ठेवते

आता ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे पाणी, सरबत, फळांचे रस यांचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवले जाते.  सकाळी मध मिसळून कोमट पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते, त्यामुळे तुम्ही सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि मधाने करू शकता.

पचनसंस्था सुधारते

मध पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी सकाळी मध आणि कोमट पाण्याने सुरुवात करावी, यामुळे अपचन आणि फुगल्यापासून आराम मिळू शकतो. याशिवाय मधामध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात जे आतड्याच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

मधामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे अनेक रोगांपासून तुमचे संरक्षण करतात. जर तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून रोज रिकाम्या पोटी प्यायले तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

पित्ताचा त्रास कमी करते

मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे घसा खवखवणे आणि सूज कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही सूज संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर मध आणि कोमट पाण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करा.

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेवर उठलेले मुरूम आणि डागांना चेहऱ्यावर लावण्यासाठीच्या क्रिम वापरल्या जातात. पण, अनेकदा पोटातून गेलेलं औषध तुमच्यासाठी फायद्याचं ठरणारं असतं. रोज सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या जसे मुरुम आणि डाग दूर होण्यास मदत होते. हे तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा फेशिअल न करता तुकतुकीत आणि तजेलदार दिसायला लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT