Travers Beynon sakal
लाइफस्टाइल

सिंगल पोरांचा आयडल डझनभर गर्लफ्रेंड फिरवतो, काय आहे सिक्रेट?

एका अब्जाधीश माणसाने गर्लफ्रेंड बनू इच्छिणाऱ्या मुलींसाठी अर्ज जारी केलाय.

सकाळ डिजिटल टीम

एका अब्जाधीश माणसाने गर्लफ्रेंड बनू इच्छिणाऱ्या मुलींसाठी एक अर्ज जारी केलाय. गर्लफ्रेंड बनणाऱ्या मुलींना आलिशान घरासोबत अनेक सुविधांचा लाभ मिळणार असे या अब्जाधीशाचे म्हणणे आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या अब्जाधीश व्यक्तीचे नाव ट्रॅव्हर्स बेनॉन(Travers Beynon) आहे.

ट्रॅव्हर्स बेनॉन त्याच्या वाइल्ड पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रॅव्हर्सने नुकताच त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तो एका पुलात 150 मुलींसोबत एन्जॉय करताना दिसला.

50 वर्षीय ऑस्ट्रेलियन टोबॅको बिजनेस टायकून ट्रॅव्हर्सची ओळख अॅडल्ट मैगजीन प्लेबॉयचा फाउंडर ह्यू हेफनर (Hugh Hefner) सारखी आबे. त्याला स्वतःला कँडीमन म्हणवायला आवडते. त्याच्याकडे त्याच नावाचा एक आलिशान राजवाडा आहे, ज्यामध्ये तो त्याचे कुटुंब, डझनभर मैत्रिणी आणि मित्रांसह एन्जॉय करतो.

Polygamy लाइफस्टाइल जगणाऱ्या ट्रॅव्हर्सचे सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे 3 लाख फॉलोअर्स आहेत, तर त्याच्या Candy Shop Mansion इन्स्टा पेजवर सुमारे 8 लाख फॉलोअर्स आहेत.

ट्रॅव्हर्सने कँडी शॉप मॅन्शन नावाची वेबसाइट देखील चालवतो, ज्यामध्ये तो दैनंदिन आयुष्याची माहिती देतो. या वेबसाइटवर त्याने एक प्रक्रिया खुली केली आहे.जिथे मुली त्याच्या गर्लफ्रेंड बनण्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांनी काही नियम लागू केले आहेत.

अब्जाधीश ट्रॅव्हर्सची गर्लफ्रेंड बनण्यासाठी तसेच आलिशान लाईफस्टाईल जगण्यासाठी आणि सोबतच वाईल्ड पार्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अर्ज सबमिट करावा लागेल. त्यानंतर ट्रॅव्हर्स इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्याशी सुरवातीला संपर्क साधतील. जर त्याला ती मुलगी आवडली तर तो तिला आठवड्याच्या शेवटी आमंत्रित करणार. त्याला भेटायला येणाऱ्या मुलींना प्रवासाचा सर्व खर्च दिला जाईल.

ट्रॅव्हर्सच्या या राजवाड्यात राहण्यासाठी, मुलगी केवळ आकर्षकच नाही तर तिच्यात विनोदबुद्धी देखील असली पाहिजे आणि मनमिळाऊ सुद्धा असावी.ट्रॅव्हर्स त्यांच्या मैत्रिणींना डिझायनर कपडे, वर्ल्ड टूर, फाइव स्टार होटलमध्ये लंच किंवा डिनर, महागड्या गाड्या, दागिने देणार. याबदल्यात, ट्रॅव्हर्सच्या मैत्रिणींना चांगला मेकअप करावा लागेल. स्टायलिश कपडे घालावे लागतील आणि फिट सुद्धा राहावे लागेल. अतिरिक्त खर्चासाठी त्यांना दर आठवड्याला 40 हजार रुपयेही दिले जाणार आहेत.

याशिवाय राजवाड्यात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी मैत्रिणीला किंवा बाहेक कोणालाही शेअर कराव्या लागणार नाही. त्या ट्रॅव्हर्सशी पूर्णपणे एकनिष्ठ असाव्यात. सोबतच त्या गर्लफ्रेंड्नी कोणाशीही रिलेशनशिपमध्ये राहू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C. P. Radhakrishnan: सर्वसामान्यांना उच्चपदी बसविणे ही लोकशाहीची ताकद; राधाकृष्णन यांच्याविषयी पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार

Winter Tourism Spots: थंडीत फिरायला जायचं प्लॅन करताय? "या" 5 निसर्गरम्य ठिकाणांना द्या भेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात दुपारी 1.30 वाजेपर्यंत 35% पेक्षा जास्त मतदान

Pimpri News : पीएमपी चालक-वाहक बनले देवदूत; बसमध्ये हृदयविकाराचा झटका आलेला प्रवासी बचावला

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

SCROLL FOR NEXT