लाइफस्टाइल

सासऱ्यांशी वडिलांसारखं नातं कसं निर्माण कराल? या 7 टिप्स फॉलो करा

भक्ती सोमण-गोखले

लग्न झाल्यानंतर मुलीला तिच्या सासरच्यांशी जुळवून घ्यावे लागते. तिकडच्या पद्धती समजून घ्याव्या लागतात. महत्वाचे म्हणजे नवऱ्यासोबतच त्याच्या आई-वडिलांशी नातं निर्माण करावं लागतं. सासु- सुनेच्या नात्याविषयी खूप गोष्टी सांगितल्या जातात. अनेक सल्लेही दिले जातात. पण सासऱ्यांबरोबर नातं कसं असावं याबाबत फार कमी सांगितलं जातं. त्यांच्याशी वडिलांसारखं नातं असावं असं अनेक मुलींना वाटतं. काही मुलांचे वडिल कडक असतात तर काहींचे खूप मोकळ्या स्वभावाचे. पण जोपर्यंत आपण त्यांच्याबरोबर राहायला सुरूवात करत नाही तोवर स्वभावाचा अंदाज यायला वेळ लागतोच. पण काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही सासऱ्यांबरोबर तुमचं नातं वडिलांसारखे करण्यासाठी प्रयत्न करू शकता.

साधे संभाषण

लग्न ठरल्यावर सासऱ्यांशी नियमित बोलायला सुरूवात करा. त्यांना काय आवडतं, हे समजून घ्या. उगाच राजकारण किंवा धर्म, हवामानाविषयी गप्पा मारत बसू नका. त्यांची एखादी आवड शोधून त्याविषयी गप्पा मारा. या गप्पांमधून तुमच्या कॉमन आवडी निघू शकतात. त्याविषयी बोला. तुमचा स्वभावही या निमित्ताने त्यांना कळेल. त्यामुळे संभाषण तणावपूर्ण बनवू नका.

सल्ला विचारा

आपल्यापेक्षा जास्त पावसाळे सासऱ्यांनी पाहिलेले असतात म्हणजेच त्यांना खूप अनुभव असतो. त्यामुळे मुलांचे नातेसंबंध वाढवण्यासाठी आपला उपयोग होऊ शकतो असे त्याना वाटते.जर तुमच्या नात्यात काही अडचणी येत असतील किवा काही जोडीदाराविषयी समस्या असेल तर तुमच्या सासरच्या लोकांचा सल्ला विचारायला बिचकू नका. ते त्यांच्या अनुभवामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. तसेच एखादा अनुभव सांगून तुमचा दृष्टीकोन बदलायला मदत करतील.

त्यांना मदत करू द्या

सासऱ्यांना जसे तुम्हाला मदतीविषयी सल्ला द्यायला आवडते तसेच घरातील गोष्टी दुरूस्त करणेही आवडते.समजा तुम्ही घरात काम करत असताना एखाद्या उपकरणाविषयी अडचण निर्माण झाली तर ते लगेच येऊन ती समस्या सोडवतील. अशावेळी त्यांना नाराज न करता त्यांना तुम्हाला मदत करू द्या. काही सासऱ्यांना सुनेला मदत करण्यासाठी अजिबात कमीपण ावाटत नाही. सुनेला एक वेळ मदत कशी घेऊ असं वाटेल. पण आपोआपच ते मदतीला आल्याने तुमचे काम हलके होईल. भविष्यात तुमच्या मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांना नवीन कौशल्ये शिकवणे त्यांना आवडेल.

त्यांचा आदर करा

जर तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत तर उलटून बोलण्यापेक्षा संयम ठेवा. त्यांचा आदर करा. जेव्हा त्यांना ती गोष्ट तुम्हाला आवडली नसल्याचे समजून येईल तेव्हा तुम्ही त्यांच्याशी वाद घातला नाहीत म्हणून त्यांना बरं वाटेल. एखादी गोष्ट जर खूपच खटकणारी असेल तेव्हा मात्र मोकळेपणाने आदर ठेवत त्यांच्याशी याविषयी बोला.

एकत्र वेळ घालवा

तुमच्या सासरच्यांसोबत लग्नाआधी जेवढा वेळ घालवणे जमतेय तेवढा वेळ एकत्र घालवा. यामुळे त्या कुटूंबाला, माणसांना काय आवडते याचा अंदाज येईल. यावेळी सासऱ्यांना आवडत असलेल्या गोष्टींमध्ये रस घेतल्यास तुमचे एकमेकांबरोबर संभाषण वाढविण्यासाठी त्याचा फायदा होईल.

जेवण शेअर करा

आपल्या सासऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्याचा एक सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या आवडीचे जेवण बनविणे किंवा त्यांना बाहेर जेवायला नेणे. यामुळे त्यांना तुम्हाला त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, त्यांच्यांशी वडिलांसारखे नाते हवे आहे हे कळेल. जेवत असताना तुम्ही तुमचे कुटुंब, छंद आणि तुम्हाला आवडत असलेल्या इतर गोष्टींबद्दल बोलू शकता. अशाप्रकारे तुम्ही दर पंधरा दिवसांनी एकत्र जेवणाचे प्लॅनिंग करू शकता.

संपर्कात राहा

तुमच्या सासऱ्यांसोबत हळूहळू तुम्ही वडिलांसारखे नाते निर्माण करत आहात. अशावेळी त्यांच्याशी संपर्कात राहणे महत्वाचे ठरेल. तेव्हा आठवड्यातून दोन-तीन वेळा त्यांच्याशी फोनवर बोला. तुमच्या दोघांमधील बंध टिकवून ठेवण्यास आणि मजबूत करण्यास याचा फायदा होईल.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT