How To Eat Almonds esakal
लाइफस्टाइल

How To Eat Almonds : वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले बदाम भिजवून खावे की कोरडे?

सुके की भिजवलेले बदाम खावावे

Pooja Karande-Kadam

How To Eat Almonds : बदाम ड्रायफ्रुट्सच्या राजा आहे. कारण यात असलेले पोषक घटक त्याला वेगळं बनवतात. बदामात व्हिटॅमिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्वे मिळतात.

रोज बदाम खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते तसेच अनेक आजार दूर राहतात. पण बदाम कोरडे खावे की भिजवून हरवावे या समस्येमध्ये अनेकदा लोक गोंधळलेले असतात.

बदामामध्ये आरोग्यास पोषकघटकांचा समावेश असल्यानं डॉक्टर आपल्याला त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत.

बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं.

सुके की भिजवलेले बदाम खावावे, यावरून लोकांच्या मनात कायम गोंधळ असतो. कोणत्याही स्वरुपात बदाम खाल्ल्यानं शरीराला अधिक फायदे होतील, असा प्रश्न तुमच्याही मनात आहे का? जाणून घेऊया याबाबतची माहिती

भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर

बदाम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तसेच हृदयरोगापासून बचाव करते . खरं तर, सामान्य बदाम आणि भिजवलेले बदाम यात खूप फरक असतो . तज्ञांच्या मते बदाम दोन्ही प्रकारे खाल्ल्यास फायदेशीर ठरतात , पण भिजवलेले खाल्ल्याने आपल्या शरीराला बदामाचे पोषक तत्व मिळतात.

बदाम भिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक वाढतात. तसेच त्यामध्ये असलेल्या पोषक तत्व आपल्या शरीरात पटकन मिसळतात. वाळलेल्या बदामाच्या सालींमध्ये टॅनिन आढळतात , ज्यामुळे आपल्या शरीरास बदामाची पोषक द्रव्ये शोषून घेणे कठीण होते . म्हणून बदाम भिजवून खावे.

बदाम सोलून खा

बदाम सोलून खाण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. न सोललेले बदाम खाल्ल्याने रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढते. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याच्या सालीमध्ये टॅनिन असते जे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण रोखते. सोलून खाल्ल्यास शरीराला पोषक तत्त्वे मिळण्यास अडथळा येत नाही.

  • रोज भिजवलेले बदाम पचनास मदत करतात

  • हृदय निरोगी राहण्यासह वजन कमी करण्यास मदत करतात.

  • दिवसभरात 10 बदाम खाणे चांगले.

  • रिकाम्या पोटी याचे सेवन करायचे असल्यास ते भिजवून सोलून खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT