How To Make Lips Pink esakal
लाइफस्टाइल

How To Make Lips Pink : जरा गार वाटंल पण, एकदा ओठाला बर्फ लावून बघाच!

कडक उन्हात त्वचेची आद्रता टिकून राहत नाही त्यामूळे ओठ फुटण्याची समस्याही जाणवू लागते

Pooja Karande-Kadam

How To Make Lips Pink : कडक उन्हाळ्याच्या झळा सोसून आपली त्वचा तर रापलीच आहे. पण, ओठही रूक्ष झाले आहेत. कडक उन्हात त्वचेची आद्रता टिकून राहत नाही त्यामूळे ओठ फुटण्याची समस्याही जाणवू लागते. अशा परिस्थितीत अनेक महागडे लिप बाम देखील ओठांना मऊ बनवण्यात अपयशी ठरतात. त्यावर काही उपाय सापडत नाही.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेड नसल्याने ओठ फुटणे सामान्य असू शकते. परंतु ती एक समस्या नक्कीच आहे. कधी यामुळे ओठांना वेदना आणि जळजळ होते. तर कधी चेहऱ्याचे सौंदर्य कमी करण्यात त्याची विशेष भूमिका असते. परंतु बर्फ आपली समस्या दूर करण्यात चांगली भूमिका बजावू शकतो.

ओठांवर बर्फाची मालिश केल्याने फाटलेल्या ओठांपासून सुटका होतेच असे नाही. पण इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओठांवर बर्फाचे तुकडे लावण्याचे फायदे आणि पद्धती.

रक्ताभिसरण सुधारते 

ओठांवर बर्फ लावल्याने ओठांचे रक्ताभिसरण सुधारते. तसेच ओठांवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात. ज्यामुळे ओठांचा गुलाबीपणा वाढू लागतो आणि हळूहळू ओठही मुलायम होतात.

ओठ गुलाबी होतात 

जर तुमच्या ओठांवरील काळेपणा वाढला असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही आईस क्यूबची ही मदत घेऊ शकता. ओठांवर बर्फ लावल्याने ओठ एक्सफोलिएट होतात आणि ओठांचा मऊपणा वाढतो. इतकंच नाही तर पिग्मेंटेशनपासून सुटका होण्यासही बर्फ खूप मदत करतो.

ओठांची आग कमी होते

ओठांच्या त्वचेचे उन्हापासून रक्षण करण्यासाठीही बर्फ उपयुक्त ठरतो. ओठांवर बर्फ लावल्यास सूर्यप्रकाशामुळे ओठांवर होणारी जळजळ, खाज सुटणे आणि पुरळ येण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते.

ओठ हायड्रेटेड ठेवते

ओठांवर बर्फ लावल्याने ओठ हायड्रेट राहतात आणि त्यांचा ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो आणि ओठ फाटत नाहीत. इतकंच नाही तर ओठांची फुगवटा वाढवण्यासाठीही बर्फ खूप मदत करतो.

ओठांची सूज कमी करते

ओठ फुटल्यामुळे कधी कधी ओठांवर सूज येते. अशावेळी ओठांवर बर्फ लावल्याने ओठांची सूज कमी होते. तसेच चिडचिड दूर करण्यासाठी बर्फ उपयुक्त ठरतो.

अशा प्रकारे बर्फ लावा

बर्फाचा वापर थेट ओठांवर करू नये. अशावेळी बर्फ लावण्यासाठी आधी एक किंवा दोन बर्फाचे तुकडे सुती कापडात गुंडाळून घ्या. नंतर हलक्या हातांनी ओठांना हळूवारपणे मसाज करा आणि तीन ते पाच मिनिटांनी कोरड्या नॅपकिनने ओठ पुसून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT