What Happens When You’re Still Friends With An Ex sakal
लाइफस्टाइल

एक्ससोबत मैत्री ठेवणे कितपत योग्य? जाणून घ्या दुष्परिणाम

जगभरातील तज्ञ म्हणतात की तुम्ही कधीही तुमच्या एक्ससोबत मित्रता ठेवू नका

सकाळ डिजिटल टीम

आपल्या एक्ससोबत मैत्री ठेवणे कितपत योग्य आहे? ज्या व्यक्तीशी तुमचे प्रेमसंबंध होते अशा व्यक्तीशी प्रेमसंबंध तुटल्यानंतर मैत्री करणे,सहसा आव्हानात्मक ठरु शकते, हे तितकेच खरे आहेत. तुम्हाला त्यांच्यासोबत वावरताना दु:ख आणि विश्वासघाताच्या कडू क्षणांची आठवण येऊ शकते ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. (What Happens When You’re Still Friends With An Ex)

जगभरातील तज्ञ म्हणतात की तुम्ही कधीही तुमच्या एक्ससोबत मित्रता ठेवू नका किंवा त्यांच्याशी मैत्री करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्वत: ला पुरेसा वेळ द्या. ही मैत्री अवघड आणि आपल्याला गोंधळात टाकणारी असू शकते.

काही लोक त्यांच्या एक्स व्यक्तीशी उत्तम नातेसंबंध ठेवण्यास यशस्वी होतात. जर तुम्ही एकत्र काम करता किंवा एकाच कार्यालयात काम करतात. तर तुमच्यात आदरयुक्त नातेसंबंध असण्याला प्राधान्य द्यावे.

एक्स सोबत मैत्री ठेवणे, हे अत्यंत त्रासदायकही ठरु शकते. विशेषत: जर तुम्ही ब्रेकअपपासून सावरले नसाल तर अनेक भावना तुमच्यामध्ये उद्भवू शकतात. एवढचं काय तर अस्वस्थता आणि गोंधळही निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्यावर पुनर्विचार करण्याची वेळ येऊ शकते.

जेव्हा तुम्ही एखाद्या एक्स व्यक्तीशी मैत्री करता आणि नवीन नातेसंबंधात देखील असता तेव्हा समस्या अधिक निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तुमच्या नवीन जोडीदाराची तुमच्या एक्स सहकाऱ्याशी तुलना करता. ही तुलना तुमच्या सध्याच्या नातेसंबंधावर परिणाम करू शकते, ज्यामुळे तुम्ही विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकता. कारण कोणत्याही जोडीदाराला एक्ससोबत सतत केलेली तुलना आवडत नाही.

एक्सशी मैत्री करताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनांचाही विचार करावा लागेल. तुमच्या जोडीदाराला कदाचित असुरक्षित वाटू शकते किंवा त्यांना एक्स सोबत असलेली तुमची मैत्री आवडणार नाही.

जेव्हा तुम्ही एखाद्या एक्स व्यक्तीशी मैत्री करता तेव्हा ते तुमच्यावरही अवलंबून असते. तुमचा आत्ताचा जोडीदार समजूतदार असेल आणि तुम्ही त्याला विश्वासात घेऊन एक्सशी मैत्री करत असाल तर उत्तमच आहे.मात्र एक्सशी मैत्री महागात पडू नये,याची काळजी घेणे, तुमच्याच हातात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT