Marriage Rituals esakal
लाइफस्टाइल

Marriage Rituals : हिंदू धर्मात लग्नासाठी सर्वाधिक लाल रंगाच्या पोशाखाचीच निवड का केली जाते?

वधूच्या लग्नाच्या कपड्यांसाठी लाल रंगच का निवडला गेला. यामागे नेमकं काय कारण होतं ते आपण जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Marriage Rituals : हल्ली वधू मुलगी लग्नात तिच्या आवडीचा रंगाचा पोशाख परिधान करते. कोणी गोल्डन, कोणी पेस्टल तर पिंक कलरचा पोषाख परिधान करतात. मात्र प्राचीन काळापासून वधू लग्नात लाल रंगाचे वस्त्र परिधान करत आलेली आहे. मात्र वधूच्या लग्नाच्या कपड्यांसाठी लाल रंगच का निवडला गेला. यामागे नेमकं काय कारण होतं ते आपण जाणून घेऊया.

भारतीय लग्न हे त्यांच्या अनेक प्रथांसाठी आणि विधींसाठी कायम चर्चामध्ये असतात. एवढेच नाही वर्षोवर्ष चालत आलेल्या रीती आणि परंपरांच्या मागे अनेक शास्त्रीय कारणं देखील आहे. आज आपण हिंदू वधूच्या लग्नाचा पोशाख लाल रंगाचा असण्यामागचं कारण जाणून घेऊया.

लाल रंगाचे कपडे घालण्यामागे आहे धार्मिक कारण

हिंदू धर्मात देवी-देवतांना साक्षी मानून वधू-वर एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देतात. एवढेच नाही तर लग्नसमारंभात लाल, पिवळा, हिरवा असे शुभ रंग वापरण्यात आले आहेत.

वधूचा पोशाख लाल असण्यामागे हे महत्त्वाचे धार्मिक कारण आहे. शक्ती, प्रेम, शौर्य, स्नेह यांचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या माता दुर्गेची अनेक रूपात पूजा केली जाते. भगवान शिवाची पत्नी, पार्वतीचे दुसरे रूप असल्यामुळे, माँ दुर्गा नेहमी लाल साडी, सिंदूर लावून श्रृंगारात असते. त्यामुळे विवाहित महिलांसाठी लग्नानंतर लाल रंगाचे महत्व वाढते. असे मानले जाते की, लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास विवाहित स्त्रीवर माता पार्वतीचा आशीर्वाद नेहमी राहतो.

प्रेमाचे प्रतिक

मानसिकदृष्ट्या, लाल रंगाचे महत्त्व वेगवेगळ्या लोकांसाठी भिन्न असू शकते. लाल रंग हा अनेक ठिकाणी प्रेम, करुणा, मिलन, उत्कटता, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काही लोक याला वैवाहिक जीवनाच्या (Marriage) प्रवासाचे प्रतीकही मानतात. याशिवाय अनेक ठिकाणी रक्ताचा रंग लाल असल्याने ते प्रजननक्षमतेचे प्रतीक मानले जाते.

वैवाहिक जीवनातील समृद्धीसाठी

लाल रंग हा मंगळाचा रंग मानला जातो. ज्योतिषशास्त्रात या ग्रहाचे विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की मंगळ तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा, आनंद, समृद्धी यासह सर्व चांगल्या गोष्टी घेऊन येतो आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत करतो.

लग्नात, वधू आणि वर सर्वात सुंदर आणि वेगळे दिसतात, म्हणून ते चमकदार रंगाचे कपडे परिधान करतात. अशा वेळी लाल रंगाचा सर्वाधिक वापर केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून समजून घेतल्यास, लाल रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते, ज्यामुळे तो दुरूनही सहज दिसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Project : शक्तिपीठ महामार्ग होणारच, मंत्री उदय सामंतांचे कोल्हापुरात वक्तव्य; सर्वांना विश्वासात घेण्याचे आवाहन

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Latest Marathi News Live Update : थकबाकीमुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसांपासून बंद

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

SCROLL FOR NEXT