Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : सहकाऱ्यांनी हॉस्टेलमध्ये लैंगिक शोषण केलं, प्रयत्नांनी बनली Commercial Tax Officer ; वाचा ट्रान्सजेंडर ऐश्वर्याची यशोगाथा

'ऐश्वर्याला सहावीत शिकताना प्रथम जाणवले की ती इतरांपेक्षा वेगळी आहे'

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 :  रस्त्यावर दिसणारे तृतियपंथी भीक मागून किंवा एखादं छोटं काम करून पैसे कमावतील. नोकरीही कधी झाडू कामगार, किंवा एखाद्या दुकानात सेल्समन म्हणून करत असतील, असा विचार तुम्हीही केला असेल.  तर आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. ती एक ट्रान्सवुमन असून सरकारी अधिकारीही आहे.

ही अधिकारी कोणत्या इतर देशात नाहीतर आपल्या भारतातच आहे. तिच नाव ऐश्वर्या ऋतूपर्णा. ती ओडिसाची असून सध्या सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न सामान्य विद्यार्थ्यांनाही पूर्ण करता येत नाही. मग तिथे तृतियपंथी असलेल्या ऐश्वर्याने हे कसं केलं तिला काय सहन करावं लागलं याबद्दल जाणून घेऊयात.   

जगभरात असे अनेक ट्रान्सजेंडर आहेत ज्यांनी समाजाचे टोमणे अत्याचार सहन करून इतिहास रचला आहे. ऐश्वर्या ऋतुपर्ण प्रधान ही देखील त्यापैकीच एक आहे. जिने शाळेत शिक्षकांकडून अपमान सहन केला. कॉलेजच्या वसतिगृहात लैंगिक शोषणाचीही ती बळी झाली.

या मानसिक आघातातून बाहेर येण्यासाठी खडतर प्रवास केला. पण आपले स्वप्न जीवंत ठेवले. ऐश्वर्याने केवळ सामाजिक लढा दिला नाही तर तिने भारताची पहिली ट्रान्सजेंडर सिव्हिल सर्व्हंट बनून इतिहासही रचला. (Navratri 2023)

तिने भारताची पहिली ट्रान्सजेंडर सिव्हिल सर्व्हंट बनून इतिहासही रचला

ओडिसातील कंधमाल जिल्ह्यातील कटीबगेरी गावातील रहिवासी असलेल्या ऐश्वर्याला सहावीत शिकताना प्रथम जाणवले की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिची खरी ओळख तिला झाली. सुरूवातीला कोणालाही गोंधळून जायला होईल तसं ऐश्वर्याचंही झालं. पण हळूहळू तिने हे सत्य मनापासून स्वीकारले आणि स्त्रीसारखे वागू लागली.

ऐश्वर्या एक ट्रान्सजेंडर आहे हे लोकांना माहिती होत गेलं. तसं, तिच्या जीवनातील अडचणी वाढतच गेल्या. वर्गातील एक मुलगा मुलीसारखा वागतोय हे लक्षात आल्यावर शिक्षकांनीही तिचा अपमान केला. सतत टोमणे मारले, तिच्यावर हास्यास्पद कमेंट केल्या. वर्गातील काही मुलांनी हॉस्टेलमध्ये लैंगिक शोषण सुद्धा केले. अशा परिस्थितीतही ऐश्वर्याने शाळेतील शिक्षण पूर्ण केलं.

यानंतर ऐश्वर्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) मधून पदवी प्राप्त केली. त्यांनी लोक प्रशासनात पीजीही केले आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या प्रधान ओडिशाच्या राज्य नागरी सेवा परीक्षेसाठी पुरुष उमेदवार म्हणून बसली आणि पात्र ठरली.

ऐश्वर्यासाठी हे सर्व सोपे नव्हते. तिच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नव्हत्या.लोकांनी तिच्या क्षमतेवर शंका घेऊन ती या पदासाठी पात्र नसल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न लोकांनी वारंवार केला.

2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडरला थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिल्यानंतर ऐश्वर्यासारख्या अनेकांना थोडा दिलासा मिळाला. यानंतर त्यांनी ताबडतोब आपले लिंग बदल करून घेतले. ओडिशाची राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऐश्वर्याने पारादीप पोर्ट टाउनशिपमध्ये Commercial Tax Officer कर अधिकारी म्हणून जॉईन झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT