Office Fashion  esakal
लाइफस्टाइल

Office Fashion : ऑफिस वेअरसाठी कानातल्यांची जागा घेतायत या ऑक्सिडाईज बुगड्या

बुगडी हा भारतातला खूप जुना आणि पारंपरिक दागिना

सकाळ डिजिटल टीम

Office Fashion : नाकात नथ, कानात बुगडी आणि अंगावर पारंपारिक साज यात कोणतीही स्त्री सुंदर दिसते. बुगडी हा भारतातला खूप जुना आणि पारंपरिक दागिना आहे. महाभारताच्या काळापासून हा अधोरेखित झाल्याचे पुरावे असल्याचं इतिहासकार म्हणतात.

अगदी राजा रवि वर्मांच्याही चित्रांमध्ये बुगडी दागिना म्हणून आढळून येते. कानाच्या वरच्या बाजूला हा घालतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगिन्यांमध्ये याचा समावेश आहे. बुगडी ही तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये कोप्पू म्हणून ओळखली जाते. कोल्हापुरी साजामध्ये बुगडीला प्राधान्य आहे. त्या सोन्यामध्ये आणि मोत्यांमध्ये बनवलेल्या असतात.

सध्या सगळेच पारंपारिक दागिने ऑक्सिडाईज प्रकारात बाजारात दिसतात, यात पारंपारिक सोन्याच्या बुगड्यांचीही जागा ऑक्सिडाईज बुगड्यांनी घेतली आहे. ऑफिसला कोणते कानातले घालून जावे हा प्रश्न असतोच, त्यात रोज रोज कानातले घालणं कानाला थोडं त्रासदायक आहे, कारण याने कानाच्या पाळ्या दुखतात.

त्यामुळे सध्या कानातले न घालता हटके डिझाईन असलेल्या बुगड्या घालण्याची फॅशन सुरू झाली आहे, त्यात या बुगड्यांसाठी तुम्हाला ट्रेडीशनल लुक असावा अशी गरज नाही, हे नवीन डिझाईन्स तुम्ही कोणत्याही लुक वर घालू शकतात.

यात सगळ्यात भयानक गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे कान टोचणे पण या बुगड्यांना त्याची गरज नाही, बाजारात प्रेसच्या बुगड्या ही उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही आता कान न टोचताही बुगड्या घालू शकतात आणि तेही आपल्या ड्रेसनुसार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

Nashik Crime : खुनांचा आकडा ४३ वर! नाशिकमध्ये विधीसंघर्षित बालकांकडून घातक हल्ले; पोलीस आणि गुन्हेगारांच्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT