relationship tips sakal
लाइफस्टाइल

घटस्फोट किंवा ब्रेकअप घेण्यापूर्वी करा या गोष्टींचा विचार

या गोष्टीचा विचार केला तर तुमच्यावर कधीच घटस्फोट किंवा ब्रेकअप घेण्याची वेळ येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा कोणत्याही नात्याची सुरुवात होते मग ते पती पत्नीचे नाते असो की बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंडचे नाते. नात्यातील सुरुवातीचा काही काळ अगदी सुखद असतो पण कालांतराने दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा वाढत असतात पण अपेक्षा पुर्ण झाल्या नाही तर नात्यात दुरावा निर्माण होतो.

अनेकदा परिस्थिती इतकी चिघळते की घटस्फोट किंवा ब्रेकअप घेण्याचीही वेळ येते. मात्र घटस्फोट किंवा ब्रेकअप घेताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. या गोष्टीचा विचार केला तर तुमच्यावर कधीच घटस्फोट किंवा ब्रेकअप घेण्याची वेळ येणार नाही.

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्न का केले?
लग्न पूर्णपणे संपवण्याआधी तुम्ही तुमच्या जोडीदाराला पहिल्यांदा जेव्हा भेटला त्या वेळेचा विचार करा. तुमच्या जोडीदाराकडे तुम्ही का आकर्षित झाले, याचा विचार करा. तुम्ही त्यांना तुमचा जोडीदार म्हणून निवडण्याचा निर्णय का घेतला? जेव्हा तुम्ही या सर्व जुन्या गोष्टींचा विचार कराल तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही खरोखर योग्य निर्णय घेतलाय की नाही. जर तुमचा जोडीदार आधीपेक्षा खूप बदलला असेल तर तुम्ही वेगळे होण्याचा विचार करू शकता.

प्राथमिकता (Priorities)बदलली का?

काहीवेळा जोडप्यांमधील प्राथमिकतादेखील कालांतराने बदलत असते. कदाचित तुमच्यासाठी करिअर महत्त्वाचे असेल आणि तुमच्या जोडीदारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे नाते असेल.कधी कधी कम्युनिकेशन गॅपमुळे अनेक गैरसमज निर्माण होतात आणि हे गैरसमज घटस्फोट घेण्याची वेळ आणतात. अशा स्थितीत तुमच्या जोडीदाराशी नीट बोला आणि आणि जर योग्य मार्ग सापडत नसेल, तरच घटस्फोटाचा विचार करा.

एखादी गोष्ट तुम्ही मनावर घेतली का?

नात्यात स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे यात शंका नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनावर घ्या. जर तुमचा जोडीदार कोणत्याही प्रकारे फसवणूक करत असेल तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहू शकता, कारण फसवणूक ही नात्यातील सर्वात वाईट गोष्ट मानली जाते. मात्र जर तुम्ही तुमच्या जोडीदाराविषयी सर्व काही मनावर घेत असाल आणि त्यामुळे जर तुम्ही घटस्फोट घेणार असाल तर एकदा नक्कीच विचार करा.

तुम्ही आता पण तुमच्या जोडीदारावर प्रेम करता?

प्रेम हा नात्यातील सर्वात महत्वाचा पाया आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या पती किंवा पत्नीबद्दल प्रेम वाटत नसेल तर त्यामागेही काहीतरी कारण असावे. ते कारण शोधून तुम्ही त्यावर मार्ग शोधू शकता. नात्यात जर प्रेम नसेल तर जोडप्यांना नात्यात कंटाळा येऊ लागतो आणि त्यांना वाटते की त्यांच्यातील प्रेम संपले आहे. जर त्यांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला तर नात्यात प्रेम पुन्हा येऊ शकते आणि तुम्ही घटस्फोटाचा निर्णय बदलू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT