Shweta Tiwari Birthday
Shweta Tiwari Birthday esakal
लाइफस्टाइल

Shweta Tiwari Birthday : श्वेता तिवारी सुंदर, टवटवीत चेहऱ्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स नव्हे तर हे घरगुती उपाय करते

साक्षी राऊत

Shweta Tiwari Birthday : श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. श्वेताने वयाचे ४३ वर्ष पूर्ण केले आहेत. मात्र तिच्या सौंदर्याकडे बघता तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते. मात्र श्वेता तिचे तारुण्य जपण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरत नाही तर घरगुती उपाय करते. तिच्या वाढदिवशी तिचे स्कीन केअर रूटीन जाणून घेऊया.

श्वेता तिच्या चेहऱ्याची निगा राखण्यासाठी हे उपाय करते

हळदीचा फेस पॅक

चेहऱ्याच्या इस्टंट ग्लो साठी श्वेता हळदीचा फेस पॅक वापरते. अभिनेत्री दूधात एक चिमूट हळदी घालून चेहऱ्याला लावते. त्यानंतर हलक्या हातांनी मसाज करते. ज्यामुळे तिचा चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसते.

सीटीएम रूटीन फॉलो करते

प्रदूषण, धूळ, मातीमुळे चेहरा टॅन होतो. अशात ती रोज सीटीएम रूटीन फॉलो करते. सीटीएम म्हणजे क्लिझिंह, टोनर आणि मॉश्चरायझर. हे रूटीन ती सकाळी आणि रात्री फॉलो करते. यामुळे स्किनला डीप क्लिन करण्यास मदत होते. (Skin Care)

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ती या तेलाचा वापर करते

वाढत्या वयात त्वचेसंबंधी जाणवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी श्वेता चेहऱ्याला कुमकुमादी तेल लावते. हे तेल सुरकुत्या घालवण्यास, डार्क स्पॉट्स घालवण्यास आणि स्किन टाइट ठेवण्यास मदत करते.

रोज व्यायाम

श्वेताच्या मते, वर्कआउट आणि योगाने शरीर आणि स्किन हेल्दी राहते. वर्कआउटने घाम येतो ज्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात. आणि तुमची स्कीन ग्लोइंग दिसते. (Manoranjan News)

मुलतानी माती

श्वेता तिवारी स्कीनसाठी मुलतानी माती वापरते. मुलतानी माती चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT