Specs Cleaning Tips esakal
लाइफस्टाइल

How to Clean Glasses : चष्मा स्वच्छ असेल तरच होईल खऱ्या-खोट्याची ओळख; या टिप्सनी करा Specs चकचकीत!

प्रवासात, घाईच्यावेळी शेविंग फोम पण करेल Specs Clean, कसे ते वाचा

Pooja Karande-Kadam

Specs Cleaner Tips : डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी लोक शक्य ते सर्व प्रयत्न करतात. त्याचबरोबर डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्म्याचा वापरही सर्रास केला जातो.

मात्र, चष्म्याचे ग्लासेस साफ करणेही खूप अवघड असते. अशावेळी अनेक प्रयत्न करूनही जर चष्मा सहज साफ होत नसेल तर काही सोप्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही चुटकीसरशी चष्मा स्वच्छ करू शकता.

खरं तर काही लोकांना उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काळा चष्मा घालणे आवडते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी आठवडा झाली की अनेकांना टेस्टेड चष्मा घालावा लागतो, पण चष्म्याची काच अस्वच्छ झाल्यानंतर लोकांना काहीही दिसणे अवघड होऊन बसते.

तर चला तर मग आम्ही तुम्हाला घरच्या घरी आय ग्लास क्लीनर कसे बनवायचे ते सांगतो, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज चष्मा चमकवू शकता.

विच हेझल जेल

विच हेझलपासून आय ग्लास क्लीनर तयार करण्यासाठी अर्धा कप डिस्टिल्ड पाण्यात अर्धा कप विच हेजल मिसळा आणि मिक्स करा. आता हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून लेन्सवर स्प्रे करा आणि नंतर मायक्रोफायबर कापडाने ग्लास पुसून स्वच्छ करा.

कोलगेट वापरा

चष्म्यावरील छोटे-छोटे स्क्रॅचही सहज पणे काढून टाकले जातात. यासाठी काचेवर हलकी टूथपेस्ट ठेवून ती कापूस किंवा मऊ लोकरीच्या कापडाच्या साहाय्याने हलक्या हातांनी चोळून स्वच्छ करावी. सुमारे 30 सेकंद स्वच्छ करा. तीस सेकंदानंतर तुम्हाला दिसेल की काचेवरील स्क्रॅच काढून टाकण्यात आले आहेत.

ग्लास क्लीनर

कोणताही ग्लास स्वच्छ करण्यासाठी सर्वात सोपी आणि उत्तम गोष्ट म्हणजे लिक्विड ग्लास क्लीनर. जर तुम्ही चष्मा घालत असाल तर ते नेहमी सोबत ठेवा. विशेषत: या महामारीत.

कारण, अनेक लिक्विड ग्लास क्लीनरमध्ये अल्कोहोल असतं, जे काच साफ करण्याबरोबरच हँड सॅनिटायझरचंही काम करतं. आपण सहजपणे चष्मा साफ करू शकता आणि आपल्या हातात लावू शकता.

व्हिनेगर

व्हिनेगरपासून आय ग्लास क्लीनर तयार करण्यासाठी चार कप पाण्यात ४ चमचे व्हिनेगर मिक्स करा. आता हे मिश्रण चश्म्याच्या काचेवर स्प्रे करून मायक्रोफायबर कापडाने पुसून घ्यावे. त्याचबरोबर मायक्रोफायबर कापड नसल्यास सुती कापडही वापरू शकता.

अल्कोहोल

चष्मा स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर देखील खूप प्रभावी ठरू शकतो. त्यासाठी १ कप पाण्यात थोडे अल्कोहोल आणि १-२ थेंब डिशवॉश लिक्विड मिसळून स्प्रे बाटलीत भरून घ्यावे. आता ते चष्म्यावर शिंपडून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. यामुळे तुमची काच लगेच चमकेल.

ग्लास स्वच्छ करताना

डिस्टिल्ड वॉटरचा वापरही उत्तम ठरू शकतो. त्यासाठी व्हाईट व्हिनेगर, डिस्टिल्ड वॉटर समप्रमाणात मिसळून अल्कोहोल चोळून स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे. हे मिश्रण चश्म्याच्या काचेवर फवारावे आणि मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करावे. यामुळे तुमच्या चष्म्याची काच पूर्णपणे स्वच्छ होईल.

लिक्विड सोप

चष्मा स्वच्छ करताना ते थंड पाण्याने धुणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. तुम्ही अर्धा कप कोमट पाण्यात लिक्विड सोपचे काही थेंब मिसळा. आता हे लिक्विड चष्म्याच्या लेन्सवर लावा. त्यानंतर स्वच्छ मऊ कापडाने पुसून टाका.

शेव्हिंग फोम

शेव्हिंग फोम वापरुन ग्लास अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकता. त्यासाठी काचेवर शेव्हिंग फोम लावून थोडा वेळ ठेवावा. थोडा वेळ फोम सोडणे म्हणजे काचेवर असलेली धूळ आणि माती स्वतःच्या आत शोषून घेते.

ज्यामुळे चष्मा स्वच्छ दिसतो. थोड्या वेळाने कापूस किंवा मऊ लोकरीच्या कापडाच्या साहाय्याने फोम स्वच्छ करावा.

त्याचप्रमाणे ओल्या कापडाने ही काच स्वच्छ करू शकता.अर्धा कप डिस्टिल्ड पाण्यात अर्धा कप विच हेजल मिसळा आणि मिक्स करा. आता हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून लेन्सवर स्प्रे करा आणि नंतर मायक्रोफायबर कापडाने ग्लास पुसून स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT