Tripurari Purnima 2022  esakal
लाइफस्टाइल

Tripurari Purnima 2022 : त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा होतो हा अदभूत उत्सव; गोव्यात असाल तर नक्की भेट द्या

आज त्रिपुरारी पौर्णिमा देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते

Pooja Karande-Kadam

Tripurari Purnima 2022 : आज त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima) असून देशभरात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हिंदू धर्मीय कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा दिवस 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणून साजरी करतात. या पौर्णिमेचं औचित्य साधत सर्वत्र दिवे लावले जातात.

गोव्यातील कलाकारांसाठीही या बोटी प्रेरणास्त्रोत आहेत

देव दीपावली म्हणून हा दिवस साजरा करत असताना अनेक मंदिरं आकर्षक रोषणाई करतात. या दिवशी अनेक राज्यात वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही घाट दिव्यांनी उजळून निघतात तर काही ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. गोव्यात तर चक्क होडीच्या स्पर्धा असतात. जाणूण घेऊयात त्याबद्दल.

गोव्यात त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गोव्यातल्या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे नौकानयन स्पर्धा. कोविडमुळे गेली दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे राज्य सरकारने यंदा याचे खास नियोजन केले आहे. गोव्यात त्रिपुरारीला होडी स्पर्धा आयोजित केली जाते.

गोव्यात त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे

गोव्यातील वळवंती नदीत साखळी गावाच्या घाटावर मध्यरात्री होडी महोत्सव आणि लावणीचे सांस्कृतीक कार्यक्रम होतात. त्रिपुरारी पौर्णिमेशी जोडलेल्या अनेक कथा, परंपरा आहेत. तशा गोव्यात होणाऱ्या उत्सवाशी संबंधित अशीच आख्यायिका गोव्यात प्रचलित आहे.

नौका हा किनारी भागाचा अविभाज्य भाग आहे. गोव्यासारख्या उष्ण किनारी प्रदेशात हे आणखी महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळेच येथील सण-उत्सवांमध्ये बोटींचा विशेष समावेश असतो. या खास उत्सवात नदीचे घाट उजळून निघतात. तिथल्या नावाड्यांच्या बोटी आकर्षक पद्धतिने सजवतात. बोटींना लाइटींग आणि दिव्यांनी सजवले जाते.

या होडींवर विविध प्रकारचे देखावे असतात

गोव्यातील कलाकारांसाठीही या बोटी प्रेरणास्त्रोत आहेत. विविध रंग आणि आकाराच्या बोटी बनवून कलाकार आपली कला प्रदर्शित करतात. साखळी गावातील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात असलेल्या तलावात सजवलेल्या या बोटी पाहून मला आनंद झाला आणि त्यांचे कौतुक करून थांबलो नाही.

एका बाजूला शिवलिंग घातलेला रावण, पालखीवर ऋषी, साधू इत्यादी पौराणिक कथांवर आधारित तबल्यांनी बोटी सजवल्या होत्या.या छोट्या होड्यांवर रावण, शिवलींग, मत्सकन्या, हनूमान अशा देव देवतांचे देखावे रचण्यात येतात.

या होडींवर विविध प्रकारचे देखावे असतात. त्यामध्ये काही तरूणांनी फुटबॉलचा देखावा केला होता. यात काही कलाकार चालत्या होडीत नाटकही सादर करतात. या होडीच्या छोट्या रथांची शोभायात्रा काढण्यात येते. या शोभारथांची स्पर्धाही आयोजित केली जाते. त्यासाठी गोवा राज्य सरकार बक्षिसही ठेवते.

विठ्ठल मंदिराच्या मागे वळवंती नदीकडे घाटावर सांस्कृतिक कार्यक्रम असतो. महाराष्ट्रातील लावणी कलाकार तिथे दरवर्षी कला सादर करतात. त्यांच्यासाठी विशेष मंच उभारला जातो. तसेच, आकाशात आकर्षक आतिशबाजी केली जाते. त्यामुळे नदीतील देखावे आणि आतिशबाजीने नदी उजळून निघते. त्यामुळे तूम्हालाही हा नयनरम्य देखावा अनुभवायचा असेल तर गोव्यात या नदी घाटावर नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT