Vitamin D esakal
लाइफस्टाइल

Vitamin D : खिडकीच्या काचेतून येणाऱ्या सुर्यप्रकाशातून व्हिटामिन डी मिळतो का?

तूम्हीही खिडकीतून आलेला सुर्यप्रकाश घेता का?

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला निसर्गाने मोठे वरदान दिले आहे. त्यापैकीच एक आहेत पंतमहाभूत. पृथ्वी, अग्नी, वायू जल आणि आकाश या तत्वांनीच आपले जीवन परिपूर्ण बनवले आहे. या पाच घटकांतील प्रत्येक घटक आपल्याला निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी मदत करतो. म्हणून तर अनेक मोठे आजार बरे करण्याची ताकदही सुर्यप्रकाशात आहे. म्हणून डॉक्टर आपल्याला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सुर्यप्रकाशात बसण्याचा सल्ला देतात.

निरोगी राहण्यासाठी मानवी शरीराला अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी देखील एक असे पोषक आहे जे शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करते. सुरतचा प्रकाश हा हे पोषक तत्व मिळण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. सुर्यप्रकाशात बसल्याने हाडे, दात आणि स्नायू मजबूत होतात. तसेच, शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक शोषून घेण्यास देखील मदत होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार शरीरापासून दूर राहतात.

तूमच्याही घरात खिडकीतून सुर्यप्रकाश येतो ना?

सुर्याचे महत्त्व आपल्याला माहिती असलं तरीही आपल्याकडे फ्लॅट सिस्टीममूळे अंगण नाही. बाल्कनी असली तरी ती बंद असते. त्यामूळे अनेक लोक काचेतून येणारा सुर्यप्रकाश अंगावर घेत बसतात. पण त्याचा आपल्याला फायदा होतो का? हे अनेकांना माहिती नाही.

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणून त्याला 'सनराईस' व्हिटॅमिन देखील म्हणतात. हे मानवी शरीरातील व्हिटॅमिन डीची दैनंदिन गरज कशी पूर्ण करते. सूर्यप्रकाशापासून आपल्याला किती व्हिटॅमिन डी मिळू शकते याबद्दल तज्ञांचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे.

काचेतून येणाऱ्या सुर्यप्रकाशातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो का?

इंटिग्रेटिव्ह आणि लाइफस्टाइल मेडिसिन क्षेत्रातील न्युट्रिशनिस्ट ल्यूक कॉटिन्हो यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर व्हिटॅमिन डीशी संबंधित या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तो प्रश्न होता की काचेतून येणारा सूर्यप्रकाश देखील मानवांना व्हिटॅमिन डी प्रदान करू शकतो का?

मोकळ्या जागेतील सुर्यप्रकाश कधीही चांगला

यावर ल्यूक कॉटिन्हो म्हणाले की, सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला प्रत्यक्षात व्हिटॅमिन डी मिळत नाही, तर तुमचे शरीर व्हिटॅमिन डी तयार करते. ज्यावेळी तूमची त्वचा सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या थेट संपर्कात येते तेव्हा ते शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करते. म्हणजेच काचेतून येणाऱ्या सुर्यप्रकाशाचा तूम्हाला काहीही फायदा होणार नाही.

सूर्यप्रकाशात गेल्यावर अंगाची लाही लाही होत असेल. तर व्हिटॅमिन मिळवण्यासाठी ती योग्य वेळ नाही हे लक्षात घ्या. सकाळी येणाऱ्या कोवळ्या सुर्यप्रकाशात सर्व फायदे मिळविण्यासाठी तुम्हाला किमान 15 मिनिटे ते एक तास सूर्यप्रकाशात बसण्याची आवश्यकता आहे.

रोज सुर्यप्रकाश घ्या, औषधे दूर ठेवा

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, व्हिटॅमिन डी शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियंत्रित आणि नियंत्रित करण्यास मदत करते.

डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मुडदूस आणि प्रौढांमध्ये ऑस्टियोमॅलेशियासारखे हाडांचे आजार होण्याची शक्यता असते. याशिवाय थकवा, अशक्तपणा, हाडे दुखणे, मूड बदलणे, केस गळणे, स्नायू कमकुवत होणे, भूक न लागणे आणि वारंवार आजारी पडणे ही देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT