लाइफस्टाइल

Monsoon Nail Art : घरच्या घरी ट्राय करा हे सोपे प्रकार

शरयू काकडे

तुम्हाला पाऊस आवडतो का? मग नुसतं खिडकीत बसून पाऊस बघणार आहात का? पावसाचा आनंद घ्या, पण थोड्या हटके पध्दतीने. सध्या एक मजेदार ट्रेंड सुरु आहे. पावसापासून प्रेरित होऊन आता आर्टिस्ट सुंदर नेल आर्ट साकारत आहे. या मॉन्सून नेल-आर्टला सध्या खूप पसंती मिळत आहे. पावसाच्या सुंदर छटा जेव्हा तुमच्या नखांवर उतरतात तेव्हा त्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.

निळा रंग हा मॉन्सून नेल आर्ट करण्यासाठी ट्रेन्डमध्ये आहे. सध्या लोक अक्वा इफेक्टला पसंती देत आहे. नखांच्या लेअरमध्ये पाण्याचे थेंब जेल वापरुन सिल केल्यानंतर हा अक्वा इफेक्ट दिसतो. इंद्रधनुष्यचे रंग आनंद आणि प्रेरना देतात. त्यामुळे मिनी रेनबो डिझाईन्सची सध्या खूप मागणी वाढत आहे. प्लेन किंवा रेडियम रंगाच्या नंखावर झिग-झॅग लाईटनिंग किंवा ग्रे रंगाच्या नखांवर ब्राईट येलो बोल्ट इफेक्ट अत्यंत खूलून दिसतो.

फ्रेंच टिप्सनुसार, पांढऱ्या आणि पिंक रंगाच्या नखांवर छत्री काढल्यास मोहक आणि आकर्षित करणारा लूक सध्या ट्रेंडीगमध्ये आहे. तुम्ही जर घरच्या घरी नेल-आर्ट करणार असाल तर सगळ्या सोपा पर्याय म्हणजे, मॅट-नेलवर मिडियम शेडमधील निळ्या रंग वापरा. ते सुकल्यानंतर ट्रान्सपरंट नेलपॉलिशचे ड्रॉप्स नखांवर सोडा आणि त्यांना व्यवस्थित सुकू द्या. त्यानंतर त्यांचा लूक पावसासारखा दिसेल.

Monsoon Nail Art

नेल आर्ट करताना...

  • फायलरने नखांना व्यवस्थित शेप देऊन घ्या.

  • नेल वाईप्सने नख स्वच्छ करुन घ्या.

  • नखांवर शिअर पिंक किंवा व्हाईट रंगाचे एक लेअर लावून घ्या.

  • तुमच्या आवडीच्या रंगाचे जेल पॉलीश त्यावर लावा किंवा डार्क ग्रे किंवा काळ्या रंगाचे नेलपॉलीश वापरला तरी परफेक्ट रेनी लूक मिळेल.

  • काही मिनिंट नेलपेंट सूकू द्या.

  • स्टीपर ब्रश किंवा नेल आर्ट पेन घ्या जेल नेल पॉलिश वापरुन नखांवर अंब्रेला काढा. पुन्हा काही वेळ ते सूकण्यासाठी द्या. त्यानंतर स्काय ब्लू जेल पॉलिश वापरुन रेन डॉप्स काढा.

  • वेगवेगळे रंग वापरुन अंब्रेला ड्रा करा. त्यासाठी हवा तितका वेळ घ्या.

  • त्यावर ट्रान्सपरंट रंगाच्या नेलपेंटने एक शेवटचा हात फिरवा.

    सगळे संपल्यावर नखांच्या आसपास क्युटिकल ऑईल (cuticle oil) लावा.

The Dark Rainy Showers Rain

द डार्क रेनी शॉवर्स (The Dark Rainy Showers)

तुम्ही नेल आर्टमध्ये नवखे असाल आमि तुम्हाला सोप्या नेलआर्टमधून मॉन्सून नेल आर्ट ट्राय करु शकता. रेन शॉवर नेल आर्ट तुमच्यासाठी एकदम उत्तम ठरेल. नेलपेंटचा बेस डार्क किंवा लाईट असा ठेवून कॉन्ट्रास्टींग रंग वापरुन रेनफॉल ड्रा करु शकता.

Droplets And Blooming Flowers

पावसाचे थेंब आणि फुलं (Rain Droplets And Blooming Flowers)

या टाईपच्या नेल आर्टमध्ये मॉन्सूनचा इफेक्ट व्यवस्थित खुलतोय. नखांच्या अर्ध्या भागावर सुंदर फुललेली फुले आणि उरलेल्या भागात ट्रान्सपरंट पावासाचे थेंब काढू शकताय.

A Rainy Day Story

अ रेनी डे स्टोरी (A Rainy Day Story)

नखांद्वारे स्टोरी सांगणे. तुम्ही जर स्टोरी टेलर असाल तर तुमच्या नखांचा कॅनवास सारखा वापर करून तुम्हा यंदाच्या मॉन्सूनमध्ये मधील भावना नेल आर्ट द्वारे वापरु शकता. तुम्हाला फक्त काळजीपुर्वक अचूकपणा आणि निऑन आणि गडद रंगांची आवश्यकता आहे

Cloudy Day)

क्लाऊडी डे( Cloudy Day)

ढगाळ वातवरण म्हणजे पावासाळी वातवरणाचे परफेक्ट वर्णन आहे. तुमच्या नखांना मान्सून लूक देण्यासाठी तुम्ही ग्रे बॅकग्रांऊड वापरुन क्युट ढग काढू शकता. गॉथिक लूक साठी काळ्या रंगाच्या नेलपॉलिशचा वापर करा.

Clouds And Thunderstorm

ढग आणि वादळ(Clouds And Thunderstorm)

निळ्या आकाशी रंगावर क्युट ढग हा मॉन्सून लूकमध्ये फेमस आहे. नेलआर्टमध्ये एका सोडून एका नखावर वादळी टच पॉप्युलर आहे. वादळापुर्वीची विजांचा कडकडाट दर्शविणारे नेलआर्टला खूप पंसती मिळते आहे.

Blossoming White Daisies

ब्लॉसमिंग व्हाइट डेझीस (Blossoming White Daisies)

या छोट्याशा फुलांच्या नेलआर्टमुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. आपल्या साधा लूक खूप जास्त आवडतो. तुमच्या फ्रेंच मॅनीक्युअरमध्ये नकांच्या कॉर्नवर पांढरी फुले काढून मॉन्सून टच देऊ शकता.

Monsoon Nail Art

रेनी लूक साठी ट्राय करा टीप्स

  • - मिनिमालिस्ट डिझाईन्स

  • - इस्ट्रब्लिशमेटस्ट विथ नेल ज्वेलरी

  • - न्यूड नेल विथ 3 डी आर्ट

  • - होलोग्राफिक इफेक्ट

  • - स्टिक ऑन फ्लॉवर विथ रेन डॉप्स

सध्या कोणत्या रेन लूकला मिळतेय पसंती

  • इंद्रधनुष्य

  • पावसाचे थेंब

  • निऑन अंब्रेला

  • लाईटनिग बोल्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT