Motivational speaker
Motivational speaker google
लाइफस्टाइल

पैसा कमवण्याचे योग्य वय कोणते; Motivational speaker काय म्हणतात ?

नमिता धुरी

मुंबई : Motivational speaker सोनू शर्मा दीर्घकाळापासून देशातील तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या, ते नेटवर्क मार्केटिंग करतात आणि देशातील सर्वांत मोठा नेटवर्क मार्केटर आहेत. पण त्यांची बोलण्याची कला आणि संघर्षाच्या कथांमुळे ते आज देशभरातील तरुण आणि मुलांचे आवडते बनले आहेत.

एका संकेतस्थळाशी बोलताना सोनू शर्माने आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले. आजची तरुण पिढी आपल्यापेक्षा अधिक हुशार असून देशाच्या उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण पद्धतीत बदल हवा

आपल्या सुरुवातीच्या टप्प्याचा संदर्भ देत सोनू शर्मा म्हणाले, “मला आपल्या आयुष्यात समतोल कसा साधावा हे माहीत नव्हते. आम्ही खेळायचो तेव्हा दिवसभर खेळायचो आणि जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा दिवसभर फक्त काम करायचो. पण हा बदल आजच्या तरुण पिढीमध्ये दिसून येतो.

आता तरूणाई जीवनात समतोल साधायला शिकली आहे. तंत्रज्ञान आल्यापासून तरुण पिढी अधिक सशक्त आणि साधनसंपन्न झाली आहे. आताची मुले एकत्र काम आणि मनोरंजन दोन्ही करतात. आमच्या काळात असे नव्हते. तंत्रज्ञानाच्या आगमनाने यशाचे मापदंड बदलले आहेत, असे ते म्हणाले.

भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले, "भारताला आता आपल्या शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे. तरुणांना कौशल्ये शिकवणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना केवळ नोकऱ्याच मिळू शकत नाहीत तर व्यवसायही सुरू करू शकतील. शाळेत मुलांना जे शिक्षण दिले जाते ते बाहेरच्या जीवनात चालत नाही आणि जे बाहेरच्या जगात उपयोगी पडते ते शाळेत शिकवले जात नाही."

वयाच्या १६व्या वर्षी काम करायला सुरुवात केली पाहिजे

सोनू शर्मा यांनी तरुणांना करिअरबाबत सल्ला देताना सांगितले की, प्रत्येक तरुणाने लहानपणापासूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला हवे. ते म्हणाले, "मी वयाच्या १७ व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली आणि आतापर्यंतच्या अनुभवातून हे शिकलो आहे की, कोणत्याही कामात प्रगती करण्यासाठी तुम्हाला ५ ते ७ वर्षे गुंतवावी लागतात.

अशा परिस्थितीत तुम्ही लवकर सुरुवात केली तर बरे. तुम्ही वयाच्या १६ किंवा १७ व्या वर्षी सुरुवात केली, तर तुम्ही २४ ते २५व्या वर्षी तुमच्या आयुष्यातील एका चांगल्या टप्प्यावर पोहोचला असाल."

त्यांनी युवकांना कामासोबतच अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, अभ्यास आणि शिकणे ही अशी प्रक्रिया आहे जी आयुष्यभर टिकते आणि ती तुम्ही कामासोबतच करू शकता.

आवडीबरोबरच जाणीवही महत्त्वाची

देशातील तरुणाई, त्यांची स्वप्ने आणि त्यांचे त्यांच्या पालकांशी असलेले नाते यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोनू शर्मा म्हणाले, तरुणांमध्ये खूप उत्साह असतो, परंतु अशा परिस्थितीत ते अनेकदा संवेदना गमावून बसतात. बोध हा अनुभवातूनच येतो.

आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुणाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे, आपल्या आई-वडिलांच्या अनुभवाचा आदर केला पाहिजे. संयमाशिवाय जीवनात काहीही साध्य होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT