Watermelon sakal
लाइफस्टाइल

Watermelon : कलिंगडचा पांढरा भाग तुम्ही फेकून देता का? थांबा, असा करा उपयोग

फायदे वाचाल तर थक्क व्हाल...

सकाळ डिजिटल टीम

Watermelon : सध्या उन्हाळा सुरू आहे. जिकडे तिकडे कलिंगडाची मागणी वाढली आहे कारण उन्हाळ्यात कलिंगड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे याची विक्रीही सर्वाधिक होते. कलिंगड खाताना आपल्याला नेहमी कलिंगड हे आतूल लाल आणि गोड हवं असतं.

आपण कलिंगडचा लाल भाग खातो आणि त्याखाली असलेला पांढरा भाग तसाच ठेवतो आणि फेकून देतो पण तुम्हाला माहिती आहे का कलिंगडाचा पांढरा भाग किती उपयोगी आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (white part of a watermelon uses and benefits read tarbooj halwa recipe )

  • जर तुम्हाला वाटत असेल की कलिंगडचा पांढरा भाग निरुपयोगी आहे, तर तुम्ही चुकीचे आहात.

  • कलिंगडचा पांढरा भाग उन्हाळ्यात खूप कामी येऊ शकतो कारण यामध्ये खूप पोषक घटक असतात जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

  • कलिंगडचा पांढरा भाग खाल्याने फक्त शरीरचं हायड्रेट होत नाही तर वजन सुद्धा कमी होतं.

  • कलिंगडच्या पांढऱ्या भागाचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. यापासून टेस्टी भाजी, कोशिंबीरसुद्धा करता येते.

  • तर याशिवाय कलिंगडच्या पांढऱ्या भागापासून चेरीसुद्धा बनविता येते.

  • पण त्यातील सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे कलिंगडच्या पांढऱ्या भागापासून तुम्ही शीरासुद्धा करू शकता.

कलिंगडच्या पांढऱ्या भागापासून कसा बनवायचा हलवा?

साहित्य -

  • कलिंगडचा पांढरा भाग

  • तुप

  • साखर

  • दुख

  • हिरवी वेलची पावडर

Watermelon

कृती -

  • सुरुवातील कलिंगडचा पांढरा भाग बाजूला काढून एका भांड्यात ठेवावे.

  • याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करावे.

  • त्यानंतर कढईत गरम तुप टाकावे आणि त्यात मिक्सरमधून बारीक केलेले पांढरे मिश्रण कमी आचेवर शिजू द्यावे.

  • जेव्हा याचा रंग बदलेल तेव्हा यात दुध टाकावे आणि आणखी शिजू द्यावे.

  • त्यानंतर यामध्ये थोडी साखर आणि वरुन ड्राय फ्रुट्स आणि वेलची पावडर टाकावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT