rajesh tope
rajesh tope Esakal
महाराष्ट्र

80 लाख लोकांनी अजूनही लसीचा पहिली डोस घेतलेला नाही - टोपे

निनाद कुलकर्णी

मुंबई - राज्यातील 70 ते 80 लाख लोकांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला दोस घेतलेला नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची जरी संख्या वाढत असली तर रूग्णालयात भरती होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये आजच्या घडीला 80 टक्के बेड रिकामे असल्याचे सांगत ते म्हणले की, ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झालेली नाही. कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील टोपे यांनी यावेळी सांगितले. (Maharashtra Health Minister On Covid 19 Vaccination )

टोपे म्हणाले की, देशासह राज्यात कोरोना बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या नक्कीच झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, जरी कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी, त्याती अनेकांना अगदी सैम्य लक्षणे (Light Symptoms In New Corona cases ) दिसून येत आहेत. त्याशिवाय ज्याप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड आणि ऑक्सिजनची (Hospital Bed & Oxygen Demnad ) मागणी मोठ्या प्रमाणात होती. तशी परिस्थीती नककीच आता नाहीये. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. (Corona Second Wave)

राज्यातील कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination Camp) वेग वाढविण्यावर जोर देण्यात असून 10 तारखेनंतर प्रिकोशनरी डोस (Covid 19 Booster Dose) कशा पद्धतीने देणार, याबाबतची माहिती देखील शरद पवार यांनी घेतली. त्याशिवाय औषध, निर्बंध यावर चर्चा झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतली असे टोपे यांनी यावेऴी सांगितले. कौटुंबिक कार्यक्रमांवर कडक नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी असे मत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT