Aditya Thackeray latest marathi news esakal
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शिंदे गटाकडून आव्हान; आमदार पुत्र देणार टक्कर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. राज्यभर ते दौरा कऱणार असल्याचं स्पष्ट झालं असताना आता आदित्य यांच्या दौऱ्याला एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक हे आदित्य यांना प्रत्युत्तर देणार आहे. (Aditya Thackeray news in Marathi)

आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करून शिंदे गटात गेलेले पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वातील राज्य दौरा आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेला उत्तर देणार आहे. आदित्य यांना शह देण्यासाठी सरनाईक यांच्या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे.

बंडखोर आमदारांमध्ये प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश आहे. प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. तर त्यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांना देखील ईडीची नोटीस आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता दोघे पिता-पुत्र एकनाथ शिंदे गटात सामील झाले असून शिंदे गटाकडून पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात राज्यभर दौरा काढण्यात येणार आहे.

पूर्वेश सरनाईक युवासेनेचे सचिव होते. मात्र त्यांनी गेल्याच आठवड्यात युवासेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. तसेच युवासेना पदाचा राजीनामा दिला होता. पूर्वेश हे नगरसेवक देखील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Verdict : काँग्रेसला धक्का! मीनाक्षी नटराजन यांना 'सर्वोच्च' दणका; राज्यसभा उमेदवारी अर्ज फेटाळण्याविरोधातील याचिका केली नामंजूर

Mumbai News: धारावी पुनर्विकासाला वेग! रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा; स्थलांतर प्रक्रियेला सुरुवात

Latest Marathi News Live Update : माजलगावात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

Latur Farmer: मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश! ‘शेतकऱ्याला आवडेल तो बैल द्या’; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आजारी बैल प्रकरणाची घेतली दखल..

Malegaon Child Death : मालेगावात मशि‍दीसमोर खेळताना 5 वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू; नागरिकांचा तीव्र संताप, मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

SCROLL FOR NEXT