Political latest update 
महाराष्ट्र बातम्या

Politics : महाराष्ट्रात दोनच लोकांचं जम्बो कॅबिनेट, आदित्य ठाकरेंचा टोला

आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला?, आदित्य ठाकरेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला?, आदित्य ठाकरेंचा सवाल

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले आहेत, मात्र अजूनही राज्यात या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही राज्यामधील रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे. दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात आहे, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला आहे. कायदेशीर लढाईबाबतीत भाष्य करताना, कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Political latest update)

मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा प्रश्न आदित्य यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला. तसेच माझ्या मनात राग नाही आणि कोणत्याच शिवसैनिकांच्या मनातही पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला याचं दुःख आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे ते म्हणाले, राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असं खोचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. विधानसभेमध्ये हे ४० गद्दार आरोपींप्रमाणे आले आम्ही १४ जण स्वाभिमानाने सभागृहामध्ये बसलो होतो. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्येही ते कशापद्धतीने बसमधून आले आणि गेले हे आपण सर्वांनी पाहिलं, असा टोलाही आदित्य यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT