Ahmednagar Politics News
Ahmednagar Politics News esakal
महाराष्ट्र

Ahmednagar Politics: फक्त मामा-भाचे नाही, नगरचा राजकीय गुंता नात्यातच अडकलाय, यांची मुलगी त्यांची...

रुपेश नामदास

Ahmednagar Politics News: महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आणि याच जिल्ह्यातील राजकारण संपूर्ण राज्याची दिशा ठरवते असं बोललं जातं.

अहमदनगर जिल्ह्यात एकून १२ विधानसभेचे मतदार संघ आहेत. तर २ लोकसभा मतदार संघ आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण इथून बदलतं. साखर कारखाने शिक्षणसंस्था सहकाराचं जाळं अहमदनगरच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे.

राजकारणाचे बाळकडू नगरच्या मातीमध्ये रुजलं आहे असं म्हणतात. साखरसम्राट शिक्षण सम्राट यांच्या या संपन्न जिल्ह्यात अनेक राजकीय घराणी नांदताना दिसतात यात काही आश्चर्य वाटायला नको.

यातील अनेक राजकीय घराण्यांची एकमेकांशी सोयरीक सुद्धा असताना दिसते. यात पक्षीय भेदाभेद आड येताना दिसत नाही.

नुकताच कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि कॉंग्रेसला मामा बनवल्याचे आरोप सुरू झाले.

यानिमित्ताने राज्यभरात अहमदनगरच्या राजकीय घराण्याची एकमेकात गुंतलेल्या हितसंबंधाची चर्चा सुरू आहे.

काय आहे अहमदनगरची घराणेशाही ?

या जिल्ह्यातील विखे आणि थोरात हे राज्याच्या राजकारणातील मोठी घराणे आहेत. तर शहरामध्ये कोतकर-जगताप-कर्डिले हे सोयरीक आहेत.

ग्रामीण भागात थोरात-राजाळे-राख आणि घुले-तनपुरे-काळे हे देखील एकमेकांचे सोयरीक आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रवादीची भक्कम पकड आहे.

राष्ट्रादीला २०१९ च्या विधानसभेत १२ पैकी ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र पक्षीय मर्यादा ओलांडून सुरू असलेली घराणेशाहीचा निष्कर्ष येथे काढला जातो.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बहीण अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी आहे आहेत. तर प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे हे आता आमदार आहेत तर त्यांना पहिल्याच आमदारकीत मविआ सरकारच्या काळात मंत्री पद देखील देण्यात आलं होतं.

काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे दोघे मामा-भाचे आहेत. राजीव राजळे यांच्या आई बाळासाहेब थोरात यांच्या बहीण आहेत. तर राजीव राजळे यांची बहीण शंकरराव गडाख यांची पत्नी आहेत.

पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना बाळासाहेब थोरात यांची बहीण दिली आहे. डॉ. सुधीर तांबे हे सत्यजित तांबे यांचे वडिल आहेत. तर भाजपचे आमदार शिवाजी कार्डिले यांची मोठी मुलगी संदीप कोतकर यांना दिली आहे.

कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर काँग्रेसच्या माजी उपमहापौर आहेत. तर शिवाजी कार्डिले यांचे दुसरे जावई आमदार संग्राम जगताप हे आहेत.

संग्राम जगताप हे आमदार अरूण काका जगताप यांचे पुत्र आहेत. शिवाजी कर्डिले यांची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत. तर शिवाजी कार्डिले यांची तिसरी मुलगी ज्योती कार्डिले यांना अमोल गाडे यांना दिली आहे.

हेही वाचा- सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT